अंगणवाडीची बांधकामे परिपूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडीची बांधकामे परिपूर्ण करा
अंगणवाडीची बांधकामे परिपूर्ण करा

अंगणवाडीची बांधकामे परिपूर्ण करा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
....

अंगणवाडीची बांधकामे परिपूर्ण करा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर,ता.२३:जिल्‍ह्यात अंगणवाडीची बांधकामे सुरु आहेत. मात्र अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण असून, त्या कामांची बिले काढण्याचा प्रयत्‍न सुरु आहे. हे योग्य नाही. जी बांधकामे झाली आहेत, ती मुलांनी बसण्यायोग्य आहेत का, याची खात्री करावी. मुलांची बैठक व्यवस्‍था असेल तरच त्या कामांची बिले अदा करावीत, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. ते बांधकाम समितीच्या बैठकीत बोलत होते. अर्धवट बांधकामाची बिले काढण्यासाठी प्रयत्‍न सुरु असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिध्‍द केले होते. त्या अनुषंगाने आज श्री.चव्‍हाण यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या.

जिल्‍हा नियोजन मंडळाकडून अंगणवाडीची बांधकामे सुरु आहेत. मात्र शिरोळसह काही तालुक्यात अंगवाडीची बांधकामे अर्धवट असतानाच बिले काढण्याचा प्रयत्‍न सुरु आहे. अर्धवट बांधकामे झालेल्या अंगणवाडी ताब्यात घेण्यास महिला व बालकल्याण विभागाने विरोध केला आहे. त्यावरुन बांधकाम विभाग, महिला बालकल्याण विभागात वाद निर्माण झाला आहे. अंदाजपत्राकाप्रमाणे काम केल्याचा दावा बांधकाम विभाग करत आहेत. तर टाईप प्‍लॅनप्रमाणे हे काम झाले नसल्याचा दावा महिला बालकल्याण विभागाने केला आहे. याबाबत वृत्त ‘सकाळ’ने प्रसिध्‍द केले होते.

सोमवारी (ता.२३) बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत अर्धवट अंगणवाडीच्या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी अर्धवट बांधकाम झालेल्या अंगणवाड्यांची माहिती श्री.चव्हाण यांनी घेतली. यावेळी अर्धवट बांधकाम झालेल्या सर्व अंगणवाड्यांची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींचा निधी घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.