व्हाईट आर्मीतर्फे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हाईट आर्मीतर्फे अभिवादन
व्हाईट आर्मीतर्फे अभिवादन

व्हाईट आर्मीतर्फे अभिवादन

sakal_logo
By

77835
व्हाईट आर्मीसह विविध संस्थांचे
सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
कोल्हापूर, ता. २३ : व्हाईट आर्मीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भारत माता की जय, जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद, या घोषणा दिल्या. बिंदू चौकात कार्यक्रम झाला.
आर्मीतर्फे दरवर्षी बोस जयंतीनिमित्त शौर्यदिन साजरा केला जातो. यंदा शालेय विद्यार्थिनींनी हजेरी लावली. ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या वेळी आझाद हिंद सेनेतील नाणीज येथील शहीद शिपाई रामचंद्र सिमारात कोलते यांच्या कन्या रजनीगंधा आबिटकर व बस्तवडेतील शिपाई अण्णासाहेब राऊ भोसले-पाटील यांचा मुलगा प्रमोद भोसले-पाटील यांचा सत्कार झाला. या प्रसंगी बोस यांच्या स्वातंत्र्यविषयक कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांनी आझाद हिंद सेनेची केलेली स्थापना व त्यातील शिपायांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली. अशोक रोकडे, पद्माकर कापसे, प्रशांत शेंडे, विनायक घाट उपस्थित होते.-
77886
महापालिका
कोल्हापूर ः नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेच्यावतीने छत्रपती ताराराणी सभागृहात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, नगरसचिव सुनील बिद्रे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, कर्मचारी उपस्थित होते.
-
शाहू दयानंद हायस्कूल
कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२६ वी जयंती झाली. मुख्याध्यापिका एस. आर. कलिकते यांचे हस्ते प्रतिमापूजन झाले. सोमनाथ जाधव यांनी नेताजींच्या जीवनावरती मनोगत व्यक्त केले. एस. एम. कोळी यांनी आभार मानले.
...
मिलिंद हायस्कूल
कोल्हापूर ः मुध्यापक एम. एम. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेताजी बोस यांच्या कार्याचा आढावा घेतला. एन. एम. डाफळे यांनी नेताजींच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. सांस्कृतिक विभागप्रमुख बी. एस. नदाफ यांनी सूत्रसंचालन केले.
...
नूतन मराठी विद्यालय हायस्कूल
कोल्हापूर ःए. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक डी. ए. शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहायक शिक्षिका एस. एन. सोनवणे यांनी नेताजींच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सुहानी साळोखे हिने मनोगत व्यक्त केले. समृद्धि कांबळे हिने सूत्रसंचालन केले. उदिता क्षीरसागर हिने आभार मानले. जिमखानाप्रमुख आर. एन. कुंभार उपस्थित होते.
...
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था
कोल्हापूर : ‘‘सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यरत राहणे हीसुद्धा देशसेवाच असते,’’ असे थायलंडचे अर्थ मंत्रालयाचे सल्लागार चेतन नरके यांनी सांगितले नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभाजवळ नेताजींच्या प्रतिमेला नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी, प्रा. डॉ. भारत खराटे, महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत,शहर उपअभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता महानंदा सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. रसिका पाटील, पल्लवी पाटील, सुमन गुरव, संगीता पाटील, अनिष पाटील, रोहित पाटील यांच्यासह पाच लोकनियुक्त महिला सरपंच, पुरुष सरपंचांचा सत्कार केला. संस्थापक किसनराव कल्याणकर यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष दुर्वास कदम यांनी हुतात्मा क्रांती समितीतर्फे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. संस्थेचे संभाजीराव जगदाळे यांचा कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री. सरनोबत यांच्या स्ते सन्मान केला. संस्थेचे शिवाजी ढवाण, बापू साळुंखे, लक्ष्मण मोहिते, सुनील हंकारे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अनिल कोळेकर, किशोर यादव, जयकुमार शिंदे, अर्जुन शिंदे, किरण भोसले, नागरिक उपस्थित होते. कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी सूत्रसंचालन केले.
...
श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन
कोल्हापूर : श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरतर्फे सचिव नीलेश देसाई यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन झा. वर्षा हराळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती दिली. वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले. अध्यक्षा पल्लवी देसाई, विश्वस्त वेद देसाई, संस्थेचे व्यवस्थापक संदीप डोंगरे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वैशाली ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले. हेमाराणी माळवी यांनी आभार मानले.
-
फक्त फोटो
77894
कोल्हापूर ः आझाद हिंद तरुण मंडळ प्रणित दयावान ग्रुप शिवाजी पेठ यांच्यातर्फे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजन माजी नगरसेवक अजित ठाणेकर, अध्यक्ष प्रताप देसाई, गणेश पाटील, समीर वर्णे, सुनील चौगले, सुरेश सुतार, संग्राम लोहार, विजय जाधव, जयसिंग सुतार, सुरेश निकम व मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.