कसबा बावडा येथे सरपंचांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा येथे सरपंचांचा सत्कार
कसबा बावडा येथे सरपंचांचा सत्कार

कसबा बावडा येथे सरपंचांचा सत्कार

sakal_logo
By

77879
कसबा बावडा : येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयात सरपंच, नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना राजयोगिनी सुनंदा दिदी.

सेवाधर्मच मानवतेचा दुवा
सुनंदा बहेनजी; बावड्यात नूतन सरपंच, सदस्यांचा सत्कार

कसबा बावडा, ता. २३ : ‘‘जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सेवा धर्मच मानवतेचा दुवा आहे. आपण सर्वजण परमेश्वराची लेकरं आहोत. ईश्वरीय सद्भावना प्रेरणेतून आपण एकत्र आलो. सत्कर्माचा सत्कार होतो. आपण सर्वजन सत्कारास पात्र आहात,’’ असे ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी सुनंदा बहेनजी यांनी सांगितले.
येथील ब्रह्माकुमारीय विश्वविद्यालय आयोजित करवीर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होते.
सुनंदा बहेनजी म्हणाल्या, ‘‘शांती आत्म्याचा धर्म आहे. मानवी जीवनात सुख शांती, समाधान हवे असेल तर परमात्म्याचे चिंतन, राजयोग, ध्यानाशिवाय पर्याय नाही. मानवी जीवनात धर्माची, राजकीय, विज्ञानाची शक्ती असते. मात्र कोरोना काळात ही विज्ञान शक्ती हतबल झाली. आध्यात्मिक ईश्वरी शक्तिची आराधने शिवाय पर्याय नाही.’’
पुणे येथील दशरथ भाई म्हणाले, ‘‘सुसंस्कृत, चारित्र्यवान बनवणारे शिक्षण असेल तरच मानवी जीवनाची गती आणि प्रगती होते.’’
इचलकरंजी येथील बाळासाहेब भोई यांनी मार्गदर्शन केले. स्वीट सिंगर ग्रुपने ‘स्वागतम, सुस्वागतम’ गीत गायिले. तेजस्विनी हिने ‘हरीभरी दुनिया की अंगणा’ हे गीत गायिले. कृषी अधिकारी, जिल्ह्यातील विविध केंद्रातील भाई, बहेनजी उपस्थित होते. शोभा बहेनजी यांनी सूत्रसंचालन केले.