
आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या परिसरात सापडल्या सिरींज
KOP23L77883
कोल्हापूर : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू असलेल्या परिसरात सापडलेली सीरिंज.
आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा
परिसरात सापडल्या सीरिंज
कोल्हापूर, ता. २३ ः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू असलेल्या परिसरात आज सीरिंज सापडल्या आहेत. स्वच्छतागृहात आणि त्याबाहेर या सीरिंज पडलेल्या दिसून आल्या. त्यामुळे स्पर्धेबाबत परिसरात शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठात रविवारपासून फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू झाली. स्पर्धास्थळमागील स्वच्छतागृह आणि त्या सभोवतालच्या परिसरात विविध ठिकाणी सीरिंज पडल्या आहेत. या सीरिंज वेगवेगळ्या आकारातील आहेत. कुस्तीमध्ये बाजी मारण्याच्या इराद्याने काही मल्ल स्टॅमिना वाढविण्यासाठी स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचे प्रकार विविध स्पर्धांमधून समोर येत आहेत. त्यामुळे या स्पर्धेबाबतही सभागृहाच्या आवारात दबक्या आवाजात शंका उपस्थित केल्या जात आहेत. या प्रकाराची स्पर्धा संयोजकांनी गांभीर्याने दखल घेण्याची मागणी काही कुस्तीप्रेमींतून होत आहे.