ब्लॅक पँथरतर्फे सत्कार कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक पँथरतर्फे सत्कार कार्यक्रम
ब्लॅक पँथरतर्फे सत्कार कार्यक्रम

ब्लॅक पँथरतर्फे सत्कार कार्यक्रम

sakal_logo
By

77718
कोल्हापूर : ब्लॅक पँथर पक्षातर्फे शाहू स्मारक भवनातील सत्कार कार्यक्रमात बोलताना आमदार राजेश पाटील.

ब्लॅक पँथर पक्षातर्फे मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : ‘‘मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात आंदोलन करुन सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय दिला. या मायक्रो फायनान्स लढ्याची दखल अखेर महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागली. या लढ्याचे यशस्वी नेतृत्व ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई यांनी केले. यासाठी पँथरच्या कार्यकर्त्यांनी देसाई यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहावे,’’ असे चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
ब्लॅक पँथर पक्षाचा मेळावा, जाहीर सत्कार कार्यक्रम आज शाहू स्मारक भवनात झाला. पक्षाचे संस्थापक श्री. देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप देसाई, अनिल ढवण, विजय माने, मदन चौगुले, विजय घाडगे, जयकुमार मोरे आदी उपस्थित होत्या. जिल्हाध्यक्ष विश्‍वास कांबळे, आनंदा कांबळे, आनंदा सातपुते, सर्वेश देसाई, स्वप्नील देसाई, मारुती कांबळे आदींनी नियोजन केले.