इंडियन रेडक्रॉस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियन रेडक्रॉस
इंडियन रेडक्रॉस

इंडियन रेडक्रॉस

sakal_logo
By

78030

रेडक्रॉस सोसायटीने जपली सामाजिक बांधिलकी
१५ क्षयरुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पोषण आहार कीट वाटप

कोल्हापूर, ता. २४ ः येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेने ५० क्षयरुग्णांना दत्तक घेतले. यातील १५ रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले. ‘रेडक्रॉस’ च्या निर्णयाचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन रेखावार यांनी केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, रेडक्रॉस कोल्हापुरचे सचिव सतीशराज जगदाळे, खजानिस महेंद्र परमार, शोभा तावडे, डॉ. विनायक भोई उपस्थित होते.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतीं यांनी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. कुंभार यांनी केले.
क्षयरूग्णांना आहार पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट तयार केली आहेत. पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.