पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून संभाजीनगर येथील निर्माण चौकातील मोकळ्या जागेवर मित्राने डोक्यात दगड मारून एकास मारहाण केली. याबाबतची फिर्याद जखमी विजय परशराम बागणे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार सचिन पाटील (रा. गजानन महाराज नगर) याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ही घटना घडली असून काल याचा गुन्हा दाखल झाला.
-----------

आइस्क्रीमचे पैसे मागितले म्हणून मारहाण

कोल्हापूर : आइस्क्रीम दिल्यानंतर पैसे मागितले म्हणून दमदाटी करून एकास मारहाण केली. तसेच आइस्क्रीम गाडीवरील बर्फ फोडून शिवीगाळ केल्याप्रकरणी अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद भूपेंद्र मिश्रीलाल वीर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. केशवराव भोसले नाट्यगृहासमोर सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याची फिर्याद काल दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये स्वतः फिर्यादी वीर आणि त्यांचा मित्र विष्णू गिरी हे जखमी झाले. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
-------------

एसटी बसमध्ये मंगळसूत्र चोरले
कोल्हापूर : पुणे ते गारगोटी एसटीमधून जाताना अज्ञाताने महिलेचे मंगळसूत्र लंपास केले. रविवारी दुपारी चार वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. याची फिर्याद मंदाकिनी पंडितराज कर्णिक यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. पाच ग्रॅम सोन्यांचे मंगळसूत्र होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. महिन्यात ही दुसरी घटना आहे.
------------------
.........................

तपासातील दिरंगाईबद्दल ए. एस.
ट्रेडर्सविरोधी कृती समितीची नाराजी

विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन

कोल्हापूर, ता. २५ : तपासातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करीत संबंधितांना अटक होत नसल्याची तक्रार आज निवेदनाद्वारे ए. एस. ट्रेडर्सविरोधी कृती समितीने विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे केली आहे.
गुन्हा दाखल होऊन अडीच महिने उलटले तरी पोलिसांनी एकाही संशयिताला अटक केलेली नाही. संशयितांची संपत्ती जप्त केली नाही. गुन्हा दाखल असलेले अनेक संशयित ऑनलाईन बैठकीद्वारे गुंतवणूकदारांच्या संपर्कात आहेत. तरीही पोलिसांना ते सापडत नाहीत, त्यामुळे तपासाबद्दल शंका उपस्थित होत असल्याची तक्रार विरोधी कृती समितीने केली आहे. निवेदनावर रोहित ओतारी, विश्‍वजित जाधव, गौरव पाटील आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, ए. एस. ट्रेडर्समध्ये एक पोलिसही फसला आहे. पोलिसानेच फ्रॅन्चाईजी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. सध्या परतावाच मिळत नसल्यामुळे त्या पोलिसाकडे एजंटांनी तगादा लावला असल्याचे समजते. एजंटाला एका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शिवीगाळ केल्याची तक्रार एजंटने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. या घटनेमुळे पोलिससुद्धा ए. एस. ट्रेडर्सच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे.