महर्षी शिंदे सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महर्षी शिंदे सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते
महर्षी शिंदे सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते

महर्षी शिंदे सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते

sakal_logo
By

78358
...

महर्षी शिंदे सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते

डॉ. जयसिंगराव पवार : शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्राचा समारोप

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ ः ‘अपृश्‍यता निवारण आणि जातिभेद नष्ट करणे हे महर्षी शिंदे यांच्या जीवनाचे ध्येय होते. ते सर्वसमावेशक राष्‍ट्रवादाचे प्रणेते होते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे महर्षी शिंदे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहातील ‘महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना’ या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
डॉ. पवार म्हणाले, ‘भारतीय अस्‍पृश्‍यतेचे मूलभूत चिंतन महर्षींचे जीवित कार्य होते. विचारवंताच्‍या विचारधारेमध्‍ये न सामावणारे त्यांचे व्‍यक्तिमत्त्‍व असून त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्‍वाला अनेक पैलू होते.’
या चर्चासत्रात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, किशोर बेडकिहाळ उपस्थित होते. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुस्मिता खुटाळे यांनी आभार मानले.
....

विविध वक्त्यांची मांडणी...
या चर्चासत्रात दुसऱ्या दिवशी ‘महर्षी शिंदे आणि भारतविषयक संकल्पना - राजकारण आणि इतिहासदृष्टी’ या विषयावर डॉ. अवनीश पाटील, प्रकाश पवार, टी. एस. पाटील यांनी, तर ‘महर्षी शिंदे आणि भारतविषयक संकल्पना - समाजशास्त्रीय लेखन व स्त्रीविषयक दृष्टिकोन’ या विषयावर प्रा. श्रुती तांबे, भारती पाटील, गोविंद काजरेकर यांनी विचार मांडले. ‘महर्षी शिंदे यांचे वाङ्‍मय आणि भारतविषयक संकल्पना’ या विषयावर डॉ. दत्ता घोलप, सुशील धसकटे, प्रवीण बांदेकर यांनी मांडणी केली.
.....

अस्पृश्यता निवारणाचा
पाया महर्षी शिंदेंनी घातला ः बेडकिहाळ

दरम्यान, चर्चासत्रात पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांचे बीजभाषण झाले. ते म्हणाले, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य बहुआयामी आहे. त्यांनी कारस्थानी सिद्धांताला विरोध करून बहुजनवादी राजकारणाला एक वेगळा आयाम दिला. त्यांनी देशातील अस्पृश्यता निवारण चळवळीचा संस्थात्मक पाया घातला.’
चर्चासत्रात पहिल्‍या दिवशी पहिल्‍या ‘महर्षी शिंदे आणि भारतविषयक संकल्पना-अस्पृश्यता निवारण चळवळ’ या सत्रात प्रा. गुरू आणि प्रा. चौसाळकर या वक्‍त्‍यांनी मांडणी केली. ‘महर्षी शिंदे आणि भारतविषयक संकल्पना- धर्मचिंतन’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात हेमंत राजोपाध्ये, प्रा. जयसिंग सावंत, प्रा. लवटे या वक्‍त्‍यांनी मांडणी केली. तसेच, ‘महर्षी शिंदे आणि भारतविषयक संकल्पना- शेती प्रश्‍न आणि चळवळ’ या विषयावरील तिसऱ्या सत्रात प्रा. शेषराव मोहिते, संपत मोरे, राजन गवस या वक्‍त्‍यांनी मांडणी केली.