अर्बन बँक अध्यक्ष निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक अध्यक्ष निवड
अर्बन बँक अध्यक्ष निवड

अर्बन बँक अध्यक्ष निवड

sakal_logo
By

78371
जितेंद्र नाईक, नागाप्पा कोल्हापुरे

---------------------


गडहिंग्लज ''अर्बन'' च्या
अध्यक्षपदी जितेंद्र नाईक

बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी नागाप्पा कोल्हापुरे

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : येथील दि गडहिंग्लज अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी जितेंद्र नाईक यांची तर उपाध्यक्षपदी नागाप्पा कोल्हापुरे यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमित गराडे अध्यक्षस्थानी होते.
गेल्या आठवड्यात बँकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तारुढ संस्थापक पॅनेलने १५ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. विरोधी पॅनेलला केवळ दोनच जागा मिळाल्या. आज अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी नाईक यांचे नाव राजशेखर दड्डी यांनी सुचवले, त्यास दत्तात्रय बरगे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षसाठी कोल्हापुरे यांचे नाव बाळासाहेब हिरेमठ यांनी सुचवून शारदा आजरी यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने श्री. गराडे यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. श्री. गराडे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार झाला.
अधिकाधिक कर्ज वसुली करण्यासह ठेवींमध्ये वाढ करणे व ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही नाईक व कोल्हापुरे यांनी दिली. श्री. दड्डी, राजेंद्र तारळे, श्रीमती आजरी, दयानंद कोणकेरी, रमेश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब घुगरे, एल. डी. पोवार, अरुण तेलंग, दयानंद खन्ना, किशोर हंजी, उदय जोशी, प्रितम कापसे, उदय देसाई, बाळासाहेब गुरव, उदय पाटील, संदीप पाटील- औरनाळकर, राहुल शिरकोळे उपस्थित होते.