काजू उत्पादकांना शासनाचे पाठबळ मिळवून देवू; शिवाजीराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू उत्पादकांना शासनाचे पाठबळ मिळवून देवू; शिवाजीराव पाटील
काजू उत्पादकांना शासनाचे पाठबळ मिळवून देवू; शिवाजीराव पाटील

काजू उत्पादकांना शासनाचे पाठबळ मिळवून देवू; शिवाजीराव पाटील

sakal_logo
By

78809
तुर्केवाडी : कॅशू टेक २०२३ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, डॉ. परशराम पाटील, डॉ. पी. बी. कोळेकर, मोहन परब आदी.


काजू उत्पादकांना शासनाचे पाठबळ मिळवून देऊ
शिवाजीराव पाटील; तुर्केवाडी येथे कॅशू टेक २०२३ प्रदर्शनाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ : काजू उद्योगाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या उद्योगाला शासनाचे पाठबळ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी दिले. तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे कॅशू टेक २०२३ या काजू उद्योगासाठी आवश्यक अत्याधुनिक मशिनरींच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. दीपक पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा काजू उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मोहन परब यांनी प्रास्ताविकात या विभागातील काजू उद्योगाचा समग्र आढावा घेतला. काजू उद्योगातील मशिनरींचे प्रदर्शन शहरातून घेतले जाते. मात्र, या विभागातील काजू प्रक्रिया उद्योगांची संख्या विचारात घेता ते येथे घ्यावे, यासाठी संघटनेने आग्रह धरला आणि त्यातूनच हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे सांगितले. काजू फळावर प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा शासनाने परवानगी दिल्यास शेतकऱ्यांच्या खिशामध्ये कोट्यवधी रुपयांची भर पडणार असल्याचे सांगितले. गोपाळराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील काजू प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उपस्थित होते. शामराव बेनके यांनी आभार मानले.
----------
कोट
चंदगडला काजू बोर्डाची स्थापना झाल्यास या उद्योगाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी शिवाजीराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.
- भरमूअण्णा पाटील, माजी राज्यमंत्री