बास्केट ब्रिजची खिल्ली उडवणाऱ्यांना कामातून उत्तर ः महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बास्केट ब्रिजची खिल्ली उडवणाऱ्यांना कामातून उत्तर ः महाडिक
बास्केट ब्रिजची खिल्ली उडवणाऱ्यांना कामातून उत्तर ः महाडिक

बास्केट ब्रिजची खिल्ली उडवणाऱ्यांना कामातून उत्तर ः महाडिक

sakal_logo
By

78820
....


बास्केट ब्रिजची खिल्ली उडवणाऱ्यांना कामातून उत्तर

खासदार धनंजय महाडिक यांचा विरोधकांना टोला

सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची, ता. २८ ः ‘शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बास्केट ब्रिजची संकल्पना मी मांडली. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होतो. तरीदेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ब्रिजला ५ मिनिटांत निधी दिला. त्यानंतर काही अडचणींमुळे या ब्रिजचे काम थांबले. त्यावेळी आमच्या विरोधकांनी या संकल्पनेची खिल्ली उडवली. आज त्याच बाक्सेट ब्रिजची पायाभरणी होत आहे. विरोधकांना टीकेतून नाही तर कामातून उत्तर देण्याची महाडिकांची परंपरा आहे,’ असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लगावला. बास्केट ब्रिजच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर शहरात लाखो पर्यटक, प्रवासी येतात. मात्र, त्यांना शहरात येण्यासाठी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. म्हणून राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात येण्यासाठी एक बास्केट ब्रिज उभा करावा, अशी संकल्पना मी मांडली. त्याचे डिझाईन तयार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाखवले. त्यावेळी मी राष्ट्रवादीचा खासदार होतो; पण ब्रिजचे डिझाईन पाहिल्यावर गडकरी यांनी पाच मिनिटांत १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर निवडणुकीत माझा पराभव झाला. या निवडणुकीत विरोधकांनी महाडिकांचा बास्केट ब्रिज हवेतच आहे असे सांगत याची खिल्ली उडवली. मात्र, पराभवामुळे मी शांत राहिलो. सहा महिन्यांपूर्वी मला भारतीय जनता पक्षाने राज्यसभेवर पाठवले. त्यानंतर पाठपुरावा केल्याने आज बास्केट ब्रिजची पायाभरणी होत आहे. आमचे नेते महादेव महाडिक यांनी आम्हाला विरोधकांना कामातून उत्तर देण्याचे शिकवले आहे. कोल्हापूरचे राजकारण हीन पातळीला गेले आहे. डोनेशनचे पैसे निवडणुकीत ओतायचे, सत्ता मिळवायची आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायचा. १२ वर्षे सत्ता त्यांच्याकडे आहे; पण विकासाचे काही त्यांनी केले नाही. संस्था मिळवायच्या आणि आपला विकास करायचा. असेच त्यांचे राजकारण आहे.’
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी ६ हजार ५८१ कोटींची निधी दिला आहे. त्यांच्याच निर्णयामुळे कोल्हापूर - सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला.’
---------------------
मी पण खिल्ली उडवली

खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘निवडणुकीच्या राजकारणात टीका करावी लागते. त्यावळी मी देखील धनंजय महाडिक यांच्या बास्केट ब्रिजच्या संकल्पनेची खिल्ली उडवली. मात्र, महाडिक यांनी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बास्टेक ब्रिज सत्यात उतरवून दाखवला. याचा आनंद वाटतो. गडकरी म्हणजे महाराष्ट्रातील खासदारांसाठी एक खिडकी योजना आहे. कोणताही प्रश्‍न त्यांच्याकडे गेल्यावर सुटणार याची खात्री असते.’