Sat, March 25, 2023

बावड्यातून मानाचे जग रवाना
बावड्यातून मानाचे जग रवाना
Published on : 28 January 2023, 5:48 am
७८८४५
बावड्यातून मानाचे जग रवाना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः कसबा बावड्यातून सौंदत्ती (कर्नाटक) येथे माघी यात्रेसाठी आज मानाचे जग रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. हलगीचा कडकडाट, भंडाऱ्याची उधळण करत हे जग रवाना झाले. या वेळी भाविकांनी उदं... गं... आई... उदं... असा नामघोष केला. विशेष म्हणजे बैलगाडीतून मजलदरमजल करत हे जग सैंदत्तीच्या डोंगरावर जातात. त्यानंतर शुक्रवारी (ता. ३) कसबा बावड्यातून रेणुका मातेचे भाविक मोठ्या संख्येने डोंगरावर जातात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही माघी यात्रा असते.