बाळासाहेब मानेंचे नाव उड्डाण पुलास देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब मानेंचे नाव उड्डाण पुलास देण्याची मागणी
बाळासाहेब मानेंचे नाव उड्डाण पुलास देण्याची मागणी

बाळासाहेब मानेंचे नाव उड्डाण पुलास देण्याची मागणी

sakal_logo
By

ich299.jpg
79072
रुकडी ः उड्डाण पूल नामकरणप्रश्नी सरपंच राजश्री रुकडीकर यांना महेश ठोके यांनी निवेदन दिले.
----------
बाळासाहेब मानेंचे नाव
उड्डाण पुलास देण्याची मागणी

इचलकंरजीः इचलकरंजी - कोल्हापूर मार्गावर रुकडी फाट्याजवळ रेल्वे उड्डाण पूलाची उभारणी केली आहे. लवकरच हा पूल वाहतूकीसाठी खूला होणार आहे. या पूलास रुकडी गावचे सुपूत्र तथा स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांचे नाव द्यावे, अशी मागणी इचलकरंजी पालिकेचे माजी बांधकाम सभापती महेश ठोके यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रुकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री रुकडीकर यांना दिले आहे. बाळासाहेब माने यांचे नाव उड्डाण पूलास देण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करावा. ठरावाच्या प्रती पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र रेल्वे मुंबई सेंट्रल, पूणे विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी, कोल्हापूर रेल्वे आदी ठिकाणी पाठवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत, सौ.सुजाता कांबळे, शुभम कांबळे उपस्थित होते.