Gag301_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag301_txt.txt
Gag301_txt.txt

Gag301_txt.txt

sakal_logo
By

अज्ञाताच्या खोडसाळपणाने
सांगशी -सैतवडेत पिके करपली
शेतकरी संतप्त; आंदोलनाचा इशारा

गगनबावडा, ता. ३० ः सांगशी (ता. गगनबावडा) येथे बंधाऱ्याजवळील रोहित्राचा अज्ञाताने एबी स्विच बंद केल्याने तीन दिवस वीजप्रवाह बंद राहिला व त्याआधी दोन दिवस कळ्यावरून वीजप्रवाह बंद होता. त्यामुळे पाच-सहा दिवस वीजप्रवाह बंद असल्याने त्या रोहित्रा वरील सांगशी- सैतवड्यातील 10ते 12 शेतकऱ्यांची उपसा यंत्रे बंद होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात विजेअभावी पिके करपू लागल्याने संबंधित शेतकरी संतप्त झाले असून ''त्या '' अज्ञात व खोडसाळ व्यक्तीचा तातडीने शोध घ्यावा व बंदोबस्त करावा. अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. सांगशी सैतवडे हा वाड्या वस्त्यांचा भाग असून परिसर विखुरलेला आहे. जवळजवळ 200 च्या आसपास विद्युत यंत्रे आहेत. येथे कायमस्वरूपी महावितरणच्या कर्मचारी मिळावा म्हणून अनेक वेळा मागणी केलेली आहे. पण महावितरणने दुर्लक्ष केलेले आहे.

-----------
कोट
कुणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे एबी स्विच बंद केल्याने उपसा यंत्रांचा वीज प्रवाह बंद राहिला. याबाबत मी वरिष्ठांना माहिती देत आहे.
ः-विजय भितम, कंत्राटी वायरमन, सांगशी-सैतवडे