सात शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती

सात शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती
Published on

सात शिक्षकांना मिळाली
मुख्याध्यापकपदी बढती

२४९ शिक्षकांना मिळणार पदोन्‍नती

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३० : गेल्या अनेक महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांकडून पदोन्‍नतीची मागणी होत होती. त्यानुसार आजपासून या प्रक्रियेस सुरुवात झाली. सोमवारी (ता. ३०) सात शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्‍नती देण्यात आली आहे. तसेच एकूण २४९ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्‍नती दिली जाणार आहे. याचा पहिला टप्‍पा झाला. कागदपत्रांची तपासणी करून शिक्षकांची पदोन्‍नती केली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिली.
जिल्‍ह्यातील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्‍त होत आहेत. या जागेवर पदोन्‍नती मिळावी, अशी शिक्षकांची मागणी होत होती. मुख्याध्यापक पदास पात्र असतानाही पदोन्‍नती रखडत होती. यामुळे शिक्षकांचे नुकसानही होत होते. या सर्वाचा विचार करून श्री. चव्‍हाण यांनी शिक्षकांना पदोन्‍नती देण्याचा निर्णय घेतला. एका पदासाठी तीन शिक्षकांमधून एका शिक्षकास पदोन्‍नती दिली जात आहे. त्यानुसार तीनपटीने पदोन्‍नतीसाठी यादी तयार केली आहे. या यादीतील उमेदवारांची निवड केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com