एज्युकेशन पत्रके पत्रके एज्युकेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशन पत्रके पत्रके एज्युकेशन
एज्युकेशन पत्रके पत्रके एज्युकेशन

एज्युकेशन पत्रके पत्रके एज्युकेशन

sakal_logo
By

फक्त फोटो : 79261
कोल्हापूर : प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूलमध्ये घेतलेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत आलिया मुल्ला, तन्वी गवळी, ज्ञानेश्‍वरी धुमाळ यांनी यश मिळविले. साधना पोवार यांना उपक्रमशील भूगोल शिक्षिका पुरस्कार मिळाला. मुख्याध्यापिका शैलजा भोसले यांना सन्मानपत्र मिळाले. पर्यवेक्षिका वर्षा पाटील, संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले.
...
‘जयभारत’मध्ये सूर्यनमस्कार दिन
कोल्हापूर : जयभारत हायस्कूल, अखिल भारतीय क्रीडा संस्था, क्रीडा भारतीतर्फे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन एलआयसी मैदानावर घेण्यात आला. क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, बालाजी बरबडे, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष उदय पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संस्थाध्यक्ष पी. एस. जाधव, क्रीडा भारतीचे सदस्य यांच्या हस्ते सूर्य प्रतिकृतीचे दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन झाले. मुख्याध्यापिका अश्‍विनी पाटील यांनी सूर्यनमस्कार, योगासनाचे महत्त्व सांगितले. क्रीडा भारतीचे अध्यक्ष श्रीपाल जर्दे, उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, उमा इंगळे, ॲड. संदीप पोवार उपस्थित होते. वैभव कांबळे यांनी परिचय करून दिला. अरुण कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. मारुती निकाडे यांनी आभार मानले.
...
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन
कोल्हापूर : शाहू दयानंद हायस्कूल, विविध शाखांतर्फे पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलन झाले. आर्यसमाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे माजी अध्यक्ष दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष ॲड. इंद्रजित पाटील-कौलवकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, सचिव ॲड. अनिरूद्ध पाटील-कौलवकर, संचालक श्री. वारके, संजय पाटील-शिंगणापूरकर, प्रफुल्ल कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापिका एस. आर. कलिकते यांनी प्रास्ताविक केले. एस. ए. जाधव यांनी आभार मानले.
-
झोनल मॅनेजर्स क्लबतर्फे संमेलन
कोल्हापूर : आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागामध्ये झालेल्या पश्चिम क्षेत्रीय विभागाच्या विमा प्रतिनिधींसाठीचे झोनल मॅनेजर्स क्लबतर्फे हॉटेल पॅव्हेलियनमध्ये संमेलन झाले. पश्चिम विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक बी. एस. मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. पश्चिम विभागाचे प्रादेशिक प्रबंधक (विपणन) सुश्री अरविंदर सिध्दू, प्रादेशिक प्रबंधक (विपणन) अतनु सेनगुप्ता, कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक अभय कुलकर्णी उपस्थित होते. सिध्दू म्हणाले, ‘आनंदा ॲपमधून विमा प्रतिनिधींनी आपले सर्व विमा प्रस्ताव यातूनच नोंदवावेत. यामुळे वेळेची बचत होते. विमा प्रस्ताव त्वरित पूर्ण होऊन पॉलिसीधारकास पॉलिसी त्वरित मिळते. त्याचप्रमाणे युएलआयपी प्लॅनची विक्री करा.’’
...
79288
कोल्हापूर : विकास विद्यामंदिरमध्ये मोहनराव भाऊसाहेब भुईंबर यांच्या स्मरणार्थ स्पोर्टस् किट वाटपाप्रसंगी मान्यवर.

विकास विद्यामंदिरमध्ये स्पोर्टस् किट प्रदान
कोल्हापूर : विकास विद्यामंदिरमध्ये मोहनराव भाऊसाहेब भुईंबर यांच्या स्मरणार्थ स्पोर्टस् किट, स्मार्ट टीव्ही प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर प्रमुख उपस्थित होते. कल्पना भुईंबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सुभाष कापसे, आर. बी. पाटील, सरचिटणीस आर. वाय. पाटील, नूतन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम भोसले उपस्थित होते. मोहनराव भुईंबर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. पाटणकर यांच्या हस्ते झाले. श्री. पाटणकर आणि निखिल शहा यांच्यातर्फे विद्यालयाला चार स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना आवळे यांनी स्वागत केले. अस्लम शिकलगार यांनी परिचय करून दिला. तानाजी कवडे यांनी सूत्रसंचालन केले. कालिदास कोळी यांनी आभार मानले.
-
गोखले महाविद्यालयात कार्यक्रम
कोल्हापूर : गोखले महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी डीम युनिव्हर्सिटीअंतर्गत एकदिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. अर्पिता तिवारी, प्रा. डॉ. मंजिरी मोरे प्रमुख उपस्थित होते. सचिव प्रा. जयकुमार देसाई, दौलत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य एम. एस. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे उपस्थित होते. प्रा. प्रमोद झावरे यांनी परिचय करून दिला. डॉ. डी. व्ही. आवळे, प्रा. पी. डी. आवटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. एम. गाईंगडे यांनी आभार मानले.
...
‘नूतन मराठी’त माजी विद्यार्थी मेळावा
कोल्हापूर : नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये १९६६-२२ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. मुख्याध्यापक डी. ए. शिंदे अध्यक्षस्थानी होते. जिमखाना प्रमुख आर. एन. कुंभार, ए. डी. पाटील, सहायक शिक्षक डी. व्ही. बेंदरे उपस्थित होते. माजी शिक्षक एस. जे. राऊत, यु. डी. पाटील, बी. बी. पाटील, व्ही. एस. कुलकर्णी, एम. एस. पाटील, आर. बी. भोसले उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष समितीचे सचिन जाधव, उदय पाटील, अक्षय जगनाडे, ऋषिकेश माने, ऋषिकेश कारेकर, समाधान गोमासे आदींनी परिश्रम घेतले.
...

‘योगविद्याधाम’तर्फे सूर्यनमस्कार दिन
कोल्हापूर : योग विद्याधाम संस्थेतर्फे रथसप्तमी झाली. यानिमित्त संस्थेच्या योगवन उजळाईवाडी, कोरगावकर हॉल राजारामपुरी, चित्पावन संघ मिरजकर तिकटी, रंकाळा उद्यान, आर. के. नगर पाच नंबर, एक नंबर सोसायटी या ठिकाणी योगसाधकांनी प्रत्येकी १०८ सूर्यनमस्कार घातले. संस्थाध्यक्ष रमेश धाक्रस, कार्याध्यक्ष हरिश्‍चंद्र धोत्रे, कार्यवाह प्रकाश पाटील, संचालक पवित्रा पाटील, रेखा खबाळे, अशोक गोखले, रवींद्र ताम्हणकर, सिद्धी बकरे, सुचित्रा देसाई, वैभव कुशिरे, महादेव कागवाडे, उर्मिला पाटील, उज्जवला डफळे, अर्चना घाटगे, अर्चना लाड आदी उपस्थित होते.