
रोटरी एज्युकेशनल एक्सोची जय्यत तयारी
ich308.jpg
इचलकरंजी ः येथे होणाऱ्या रोटरी एज्युकेशनल एक्सोच्या अंतिम तयारीला गती आली आहे.
रोटरी एज्युकेशनल एक्सोची जय्यत तयारी
महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञाचे होणार मार्गदर्शन : दैनिक सकाळ माध्यम प्रायोजक
इचलकरंजी, ता. ३० ः रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हतर्फे येथे आयोजित केलेल्या रोटरी एज्युकेशनल एक्सोची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३ ते ६ फेब्रुवारीदरम्यान हा एक्सो राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक सकाळ माध्यम समूह आहे.
शहरात प्रथमच इतक्या भव्य प्रमाणात शैक्षणिक उपक्रम होत आहे. यामध्ये विविध नामांकित संस्थांचा सहभाग आहे. त्यासाठी आवश्यक तयारी गतीने सुरू आहे. कार्यक्रमस्थळी सुसज्ज असा मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणीच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. पालक व विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्याचे काम तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ ‘हेड हंटर’ गिरीश टिळक, करीअर मार्गदर्शक संतोष कार्ले, मार्केटिंग विषयातील तज्ज्ञ गौरी सरदेसाई, मॅनेजमेंट गुरु पल्लवी देसाई, यशस्वी निर्यातदार निकुंज बगडिया, ड्रोन व आयटी टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ अजिंक्य दीक्षित, एक्स्पर्ट ट्रेनर अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे. सर्वांसाठी हा उपक्रम मोफत ठेवला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष संदीप कल्याणकर व प्रोजेक्ट चेअरमन राजेश कोडूलकर यांनी केले आहे.