
‘सेबी’तर्फे विजय ककडे यांची निवड
79337
‘सेबी’तर्फे विजय ककडे यांची निवड
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांची राष्ट्रीय प्रतिभूती व बाजार संस्थेतर्फे (सेबी) ‘कोना-कोना शिक्षा’ या वित्तीय प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून निवड झाली आहे. या अंतर्गत पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दहा तासांची कार्यशाळा मोफत घेतली जाणार आहे. त्यामध्ये त्यांना बचत, गुंतवणूक, नवीन तंत्रे व सावधानता याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वित्तीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत होणार आहे.
डॉ. ककडे हे ‘सेबी’चे अर्थसाक्षरता साधनव्यक्ती म्हणून गेली १२ वर्षे काम करत आहेत. त्यांनी अर्थसाक्षरतेबाबत ६०० हून अधिक व्याख्याने घेतली आहेत. भगवान महावीर अध्यासनाच्या समन्वयकपदी ते कार्यरत आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.