खासदार धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक

sakal_logo
By

79340

खासदार धनंजय महाडिक यांच्यातर्फे ‘परीक्षा पे चर्चा’
कोल्हापूर, ता. ३० ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट असत नाही. परिश्रम आणि अभ्यासाला पर्याय नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागते, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
शालेय परीक्षा असो किंवा जगण्यातील परीक्षा असो. त्याला आत्मविश्‍वासाने आणि निडरपणाने सामोरं जा, यश तुमच्या सोबत असेल, असेही खासदार महाडिक म्हणाले. विवेकानंद महाविद्यालयात हा उपक्रम झाला.
परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना दडपण येते. परीक्षेच्या ताणतणावातून अनेक विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातील सर्वच खासदारांना आपापल्या मतदारसंघात हा उपक्रम घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम झाला. भीमा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विश्‍वराज महाडिक यांच्या पुढाकारातून ‘एक्झाम वॉरियर्स आर्ट कॉम्प्युटेशन'' या नावाने हा उपक्रम झाला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे, कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, चित्रकार विजय टिपुगडे, सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे आदींच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा झाली. आरिफ तांबोळी, विवेक कवाळे यांनी चित्रकलेची प्रात्यक्षिके सादर केली. डॉ. एस. एन. जैन, डॉ. एम. एस. देशमख, डॉ. शिरीष शितोळे, डॉ. कालिदास पाटील, कृष्णराज महाडिक आदींचे यावेळी सत्कार झाले.