
श्री श्री रविशंकर भक्ती उत्सव
७९२९७, ७२१२०
...........
79297
कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर भक्ती उत्सव रंगणार आहे. त्यासाठी मैदानावरची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )
72120 - श्री श्री रविशंकर
कोल्हापुरात आजपासून भक्ती उत्सव
श्री श्री रविशंकर यांची उपस्थिती; तपोवन मैदानावर तयारी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे उद्या (ता. ३१) पासून तपोवन मैदानावर भक्ती उत्सव रंगणार आहे. संस्थेचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस विविध कार्यक्रम होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मैदान व परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था केली असून एकूण सहा ठिकाणाहून मैदानात प्रवेश करता येणार आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठीही स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. दीड लाखांहून अधिक लोक उत्सवात सहभागी होणार आहेत. दरम्यान, हा उत्सव सर्वांसाठी खुला असून केवळ निमंत्रितांसाठीच प्रवेशिका दिल्या गेल्या आहेत.
श्री श्री रविशंकरजी यांचे मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी चारच्या सुमारास शहरात आगमन होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात चार ते सहा या वेळेत ते नूतन सरपंचांना ‘आदर्श ग्राम’ या विषयावर मार्गदर्शन करतील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून चौदाशेहून अधिक सरपंचांची यावेळी उपस्थिती असेल. त्यानंतर साडेसहापासून तपोवन मैदानावर त्यांच्या उपस्थितीत महासत्संग होईल. त्यासाठी पन्नास हजारहून अधिक लोकांसाठी आसन व्यवस्था केली असून एक लाख लोकांसाठी जमिनीवरची बैठक व्यवस्था आहे. बुधवारी (ता. १) सकाळी साडेआठला मैदानावर महालक्ष्मी होम होणार असून या उत्सवासाठी कोपेश्वर मंदिराची प्रतिकृती, अठरा फुटांचे भव्य शिवलिंग आणि तीनशे फूट लांबीचा रॅम्प साकारला आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
० कोल्हापूर शहरातून येणाऱ्या लोकांसाठी कळंबा मिसळ परिसरात
० गारगोटी, भुदरगड येथून येणाऱ्यांसाठी महाराष्ट्रनगर परिसरात
० गगनबावडा परिसरातील लोकांसाठी डी फॅमिली हॉटेल परिसरात
० राधानगरी, भोगावती, कोकणातून येणाऱ्यांनी नवीन वाशी नाका ते कळंबा रिंगरोडवरील दुर्वांकुरभवन परिसरात
० कागल व गडहिंग्लज परिसरातील लोकांसाठी एलआयसी कॉलनी परिसरात
० शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील लोकांसाठी रावजी मंगल कार्यालय केदार पार्क येथे
० दिव्यांग व निमंत्रितांसाठी राऊत मळा येथे
० कऱ्हाड, सातारा, पुणे येथील लोकांसाठी संभाजीनगर क्रीडा संकुल येथे
० इचलकरंजी, सांगली, जयसिंगपूर येथून येणाऱ्या लोकांसाठी निर्माण चौक व हॉकी स्टेडियम परिसर
लोकांनी उत्सवासाठी कोल्हापूर शहरातून न येता रिंगरोडवरून मैदानाकडे यावे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका, पोस्टर्स आणि बॅनर्सवर असणारे क्यूआर कोड स्कॅन करून सर्व मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.