
घाळी अंत्यसंस्कार
gad315.jpg
79493
गडहिंग्लज : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी रत्नमाला घाळी यांची अंत्ययात्रा निघाली.
-------------------------------------------------------------
हजारोंच्या उपस्थितीत घाळींवर अंत्यसंस्कार
गडहिंग्लज, ता. ३१ : शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांच्यावर आज अंत्यसंस्कार झाले. वडरगे रोडवरील बेलबागेच्या दफनभूमीत दुपारी एकच्या सुमारास अंत्यविधी झाले.
सकाळी सातपासून अकरापर्यंत गांधीनगरातील शिवयोगी बंगल्यावर रत्नमाला घाळी यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध मान्यवरांसह नागरिकांची रांग लागली होती. अकरा वाजता बंगल्यापासून ‘स्वर्गरथा’तून निघालेली त्यांची अंत्ययात्रा घाळी महाविद्यालय, दसरा चौक, नेहरू चौक, बाजारपेठ, बसवेश्वर पुतळा, मेन रोडवरुन शिवराज महाविद्यालय आणि त्यानंतर बेलबागेत पोचली. अंत्ययात्रेत नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी गांधीनगरात निडसोशी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, नूलचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामी, हिटणीचे महास्वामी, शिरोळचे गणपतराव पाटील, हत्तरगी मठाचे डॉ. आनंद महाराज, आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घाळी यांना आदरांजली वाहिली. बेलबागेतील शोकसभेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे, एम. एल. चौगुले, गजेंद्र बंदी, राजशेखर दड्डी, उदय जोशी, महादेव साखरे, बसवराज आजरी, डॉ. पी. आर. मोरे, राजेंद्र तारळे, चंद्रकांत दोशी, राजेंद्र गड्ड्यान्नावर, दत्ता देशपांडे, अरविंद बारदेसकर, सिद्धार्थ बन्ने, शिवाजी भुकेले, दत्ता पाटील यांनी भाषणातून शोक व्यक्त केला.