एज्युकेशन संबंधित पत्रके पत्रके

एज्युकेशन संबंधित पत्रके पत्रके

‘ब्राह्मण सभा करवीर’चा शिष्यवृत्ती
सराव परीक्षेचा निकाल जाहीर
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे पाचवी ते आठवी मराठी माध्यमातील शिष्यवृत्ती सराव परीक्षा प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये घेतली. श्री महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष पंडित विनोद डिग्रजकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रभाकर हेरवाडे, श्रीपूजक अभयदादा मुनिश्वर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल यांनी स्वागत केले. परीक्षेचे मुख्य मार्गदर्शक दि. वा. पाटील यांनी मार्गदर्शन केले. श्री. मुनिश्वर यांनी पिताश्री गंगाधरपंत मुनिश्वर यांच्या स्मरणार्थ रोख बक्षिसे दिली. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी निकाल जाहीर केला.
तन्मय कुलकर्णी, संचालक संतोष कोडोलिकर, सुधीर जोशी, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर, स्वाती सखदेव, प्रिया सामानगडकर, योगिता इनामदार उपस्थित होते. खजनानिस रामचंद्र टोपकर यांनी सूत्रसंचलन केले. संचालिका वृषाली कुलकर्णी यांनी आभार मानले. बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे : विभावरी पाटील, श्रेयस पाटील, ज्ञानेश्वरी साळुंखे, श्लोक आंबी, श्रेया वीर, करण दिवसे, आविष्कार पाटील, वरद सावंत, कार्तिकेय कुंभार, पार्थ पाटील, अक्षरा पाटील, चैत्राली चव्हाण, उत्तेजनार्थमध्ये श्रेयश पाटील, वेदांत ओउळकर, सिद्धेश मोरे.
--
सामुदायिक दासनवमी, पारायण उत्सव
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध अभ्यास मंडळातर्फे दासनवमी उत्सव हा सोमवारपासून (ता. ६) बुधवार (ता. १५) कालावधीत दुपारी दोन ते सहा वेळेत होत आहे. श्री समर्थ रामदास रचित श्री दासबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण होईल. श्री दासबोध ग्रंथावर समर्थ भक्तांकडून मार्गदर्शन होईल. दासनवमी उत्सव कार्यक्रमास श्री समर्थ भक्तांनी १५ मिनिटे सभागृहात उपस्थित राहावे. अधिक माहिती, पूर्व नोंदणीसाठी अप्पा पाटगावकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच बाहेर गावच्या भक्तांनी आपल्या घरातून अथवा सोयीच्या ठिकाणाहून श्री दासबोध पारायण करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल व, कार्यवाह श्रीकांत लिमये, दासबोध अभ्यास मंडळचे श्री. पाटगावकर, कार्यवाह बाळासो पाटील यांनी पत्रकाद्वारे केले.
...
शाहू कॉलेजमध्ये लिंगभाव समानतेवर कार्यशाळा
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत इतिहास विभागातर्फे लिंगभाव समानतेवर आधारित कार्यशाळा झाली. अग्रणी महाविद्यालय योजना समितीचे सदस्य डॉ. ताहीर झारी म्हणाले, ‘‘लिंगभेद समानता आज काळाची गरज आहे.’’ प्राचार्य डॉ. एल. डी. कदम म्हणाले, ‘‘स्त्री लिंगभेद मानू नका. लिंगभेद समानता आपल्यापासूनच सुरू करू या.’’ प्रा. विनोद आखाडे यांनी आभार मानले. विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष डॉ. एस. ए. फरास यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक प्रा. निलेश वळकुंजे यांनी आभार मानले.दुसऱ्या सत्रात सायबर कॉलेजचे सहायक प्रा. अनुराधा गायकवाड, तिसऱ्या सत्रात डॉ. संघमित्रा सरवदे यांनी मार्गदर्शन कले. सत्राध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. एम. बी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एम.के. कन्नाडे अध्यक्षस्थानी होते. इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया खोले समन्वयक होत्या. सविता माजगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
...
''त्रिमूर्ती'' पॅनेला विजयी
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांची को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी साळुंखेनगर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली. निवडणुकीत दोन पॅनेल, दोन स्वतंत्र उमेदवार उभे होते. त्यामध्ये अध्क्षक्ष विलास काईंगडे यांच्या नेतृत्वाखालील ‘त्रिमूर्ती’ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. माजी अध्यक्ष बळवंत कुलकर्णी यांच्या ‘परिवर्तन’ आघाडीचा पराभव झाला. विजयी उमेदवार असे : विलास काईंगडे, विजय कराळे, सुनील शिपुगडे, संजय कुलकर्णी (वाघापूरकर), विठ्ठल वरुटे, शीतलकुमार शेटे, जिवनसिंह रजपूत, पैलवान बाजीराव चौगुले, मधुकर शिंगारे, सुधाकर सापळे, राजन भिलारी, विनायक पोतदार, महिला प्रतिनिधी श्रीमती मंगला महाजन, मीना कागिनकर.
...
79898 अजित राणे
79899 संदीप धनवडे

अजित राणे सभापतिपदी
कोल्हापूर : जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी अजित राणे (करवीर), उपसभापतिपदी संदीप धनवडे (गडहिंग्लज) यांची एकमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी श्री. उलपे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात निवडीची सभा झाली. राणे यांचा सत्कार चालक विजयसिंह रजपूत यांच्या हस्ते झाला. धनवडे यांचा सत्कार दयानंद मोटूरे यांनी केले. मावळते सभापती रंगराव बोडके यांचा सत्कार राणे तर उपले यांचाही सत्कार झाला. सभेस सात्ताप्पा मोहिते, के. आर. किरूळकर, राजेंद्र भोजे, एम. एस. बेनके, काकासो पाटील, आर. डी. यादव, जयसिंग बिडकर, जी. डी. आदलिंग, सागर सरावणे, एस. डी. पाटील, एल. एस. इंगळे, श्रीधर भोगण, अमृत देसाई, आर. व्ही. पाटील, संघटनेचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com