इचल : आवाडे बँक वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : आवाडे बँक वर्धापन दिन
इचल : आवाडे बँक वर्धापन दिन

इचल : आवाडे बँक वर्धापन दिन

sakal_logo
By

आवाडे बँकेतर्फे हीरकमहोत्सवी ठेव योजना
स्वप्नील आवाडे; ४४४ दिवस मर्यादित कालावधीसाठी लागू
इचलकरंजी, ता. ६ ः हीरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने हीरकमहोत्सवी ठेव योजना सुरू केली आहे. ठेव योजना ही केवळ ४४४ दिवस मर्यादित कालावधीसाठी असून या ठेव योजनेस सर्वसामान्य ठेवीदारास ७.७५ टक्के व्याजाचा दर असून, ज्येष्ठ नागरिक, तसेच १५ लाख रुपये व त्यावरील रकमेच्या ठेवीदारांसाठी ८ टक्के व्याज दर बँकेने निश्चित केला आहे. तरी या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी केले.
बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त संवाद साधताना अध्यक्ष आवाडे म्हणाले, ‘बँकेबद्दलची आत्मीयता, जिव्हाळा, विश्वास व श्रद्धा यामुळेच बँक आज ‘माणसांच्या मनांना विणणारी बँक’ म्हणून लोकाभिमुख झाली आहे. बँक ४४ शाखांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे, तर कर्नाटक राज्यामध्येही दिमाखात कार्यरत आहे. मार्च २०२२ अखेर ३८०० कोटींवर एकूण व्यवसाय करून बँकेची घोडदौड दिमाखात सुरू ठेवली आहे. बँकेचा सर्वांगीण विकास, ग्राहकांचे हित व उद्योगाला चालना देणे, यासाठी ही बँक नेहमीच अग्रेसर व कटिबद्ध आहे. या सर्व प्रगतीला बँकेच्या स्थापनेपासून असलेले बँकेचे सर्व संचालक व सेवक यांची कर्तव्यदक्षता, अविरत श्रम व योगदान कारणीभूत आहे.’
-------------
नेत्रदीपक व चौफेर प्रगती करणाऱ्या आवाडे बँकेची स्थापना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अमृत हस्ते झाली. आज ६० वर्षे पूर्ण होऊन बँक ६१ व्या वर्षांत यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. ही बाब निश्चितच सहकारी क्षेत्रास भूषणावह व स्पृहणीय आहे.``
स्वप्नील आवाडे - अध्यक्ष