पोलिस चौकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस चौकी
पोलिस चौकी

पोलिस चौकी

sakal_logo
By

80879, 81204

उपनगरातील पोलिस चौक्यांना कुलूपच
स्थानिकांना पोलिस ठाण्याचाच आधार; ठाण्यांची पुनर्रचना अंमलात येणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ - शहरासह परिसरातील पोलिस चौक्यांना अनेक वेळा कुलूपच दिसते. काही चौक्या अद्याप कायमस्वरुपी बंदच आहेत. नुकताच करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. नगरमध्ये चोरी झाल्यानंतर फिर्यादीने थेट चौकी गाठली. मात्र, ती बंदच असल्यामुळे त्यांना करवीर पोलिस ठाण्यात यावे लागले. शहर परिसरातील वाढत्या चोऱ्यांचा विचार करता सर्वच चौक्यांना उर्जितावस्थेत आणण्याची गरज अधोरेखित झाली.
शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या अखत्यारित एकूण दहा पोलिस चौक्या आहेत, तर करवीर पोलिस ठाण्यातील काही पोलिस चौक्यां शहर परिसरात आहेत. मात्र, त्या ठिकाणी अनेक वेळा कुलूपच असल्याचे दिसून येते. शाहूमील पोलिस चौकी तर नेहमी बंदच असते. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर चौकीत क्वचितत पोलिस दिसतात. आर. के. नगर पोलिस चौकीत पोलिस केव्हा असतात, केव्हा नाही हे स्थानिक नागरिकांनाही कळत नाही. राजेंद्रनगर, कंळबा, शिवाजी पेठ, फुलेवाडी अशा ठिकाणीही असलेल्या पोलिस चौकींची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पोलिस ठाण्यांतील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी पोलिस चौकींची निर्मिती झाली. मात्र, प्रत्यक्षात चौक्या सुरूच नसल्यामुळे नागरिकांना पुन्हा मुख्य पोलिस ठाण्यातच चकरा माराव्या लागतात.
--------
चौकट
सुभाषनगर पोलिस ठाणे करण्याचा प्रस्ताव
पोलिस ठाण्यांची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर पोलिस विभागाकडून वरिष्ठ गृहविभागाकडे पाठवला आहे. त्यामध्ये करवीर, जुना राजवाडा आणि राजारामपुरी यांच्या कार्यक्षेत्रात बदल करून सुभाषनगर हे नवीन पोलिस ठाणे करण्याचा प्रस्ताव आहे. तो तातडीने अंमलात आणल्यास पोलिस चौकींचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघेल.
----------
चौकट
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौक्या
शाहूपुरी - ३
राजारामपुरी- २
लक्ष्मीपुरी- २
जुना राजवाडा ३
-या व्यतिरिक्त करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौक्यांचाही समावेश शहर परिसरात येतो.
त्यामध्ये आरे.के.नगर, कळंबा, फुलेवाडी यांचाही समावेश आहे.
--------
कोट
शहरातील सर्व पोलिस चौक्या कायमस्वरुपी सुरू राहतील, असे नियोजन आहे. काही ठिकाणी डागडुजी सुरू आहे, तर काही ठिकाणी पोलिस चौकात थांबतात. शाहूमील चौकी मात्र कायम बंद असते. सर्वच ठिकाणी पोलिस थांबतील, असे नियोजन आहे.
-मंगेश चव्हाण, शहर पोलिस उपअधीक्षक