
सांगलीचा विश्वनाथ बकाली सर्वोत्कृष्ट
gad68.jpg
80930
गडहिंग्लज : पॉवर जिमच्या आंतरजिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत बेस्ट फिजिक गटातील स्पर्धक प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली.
-------------------------
सांगलीचा विश्वनाथ बकाली सर्वोत्कृष्ट
पॉवर आंतरजिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धा; पवार, लोणार, वगरे, रेडेकर चमकले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : पिळदार, रेखीव स्नायु आणि आत्मविश्वासपुर्ण प्रात्यक्षिकांच्या जोरावर सांगलीच्या विश्वनाथ बकालीने ''पॉवर जिमश्री'' किताबासह रोख पंधरा हजारांचे पारितोषिक पटकावले. मेन्स फिजिक गटात कोल्हापूरच्या युवराज जाधवने बाजी मारत रोख सात हजारांचे बक्षीस मिळवले. सोलापूरचा पंचशिल लोणार (मस्कुलर), कोल्हापूरचे चंद्रशेखर पवार (पोझर), त्रषीकेश वगरे ( इम्पृव्हड), अजिंक्य रेडेकर (उपविजेता) यांनी स्पर्धेवर छाप पाडली. बॅ नाथ पै विद्यालयाच्या व्यासपिठावर झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील ११० स्पर्धक सहभागी होते.
येथील पॉवर जिमच्या वर्धापन दिनानिमित्त ही आंतरजिल्हा स्पर्धा झाली. सुमारे तीन तासाहून अधिक वेळ चाललेली ही स्पर्धा पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होती. एकुण आठ गटात स्पर्धा झाली. प्रत्येक गटातील विजेता मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला. स्पर्धा प्रमुख इम्रान मुल्ला यांनी प्रास्ताविकात स्थानिक शरिरसौष्टवपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून हि स्पर्धा होत असल्याचे सांगितले. पंच प्रमुख राजेश वडाम यांनी माहिती दिली. संगीतावर झालेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
मुख्य स्पर्धेत सर्वोकृष्ट ठरणेसाठी शरिरसौष्टवपटूंनी सर्वस्वपणाला लावले. विश्वनाथ, पंचशील, चंद्रशेखर, त्रषीकेश, अजिंक्य यांच्यात कमालीची चढाओढ रंगली. परिणामी, पंचानी निर्णयासाठी वैयक्तीक प्रात्यक्षिके बघावी लागली. अखेर विश्वनाथने लक्षवेधी प्रात्यक्षिकांच्या जोरावर मैदान मारले. फिजिक गटात देवराज निकम, अजिंक्य महामुनी, हर्षवर्धन साळुंखे, आदित्य सावंत यांना मागे टाकून युवराज जाधव प्रभावी ठरला. भाजप राज्य कार्यकरिणी सदस्य शिवाजी पाटील, कृष्णराज महाडीक, महेश कोरी, प्रा. विनायक पाटील, हणमंत शिरगुप्पे यांच्याहस्ते विजेत्यांना रोख पारितोषिकासह चषक देऊन गौरविण्यात आले. शुभम चव्हाण, ओंकार चौगुले आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.