
फेरीवाला मतदार यादीसाठी हरकती
शहर फेरीवाला समितीतील
फेरीवाला यादीबाबत १० हरकती
कोल्हापूर, ता. ६ ः महापालिकेच्या शहर फेरीवाला समिती निवडणुकीसाठी फेरीवाल्यांच्या यादीबाबत दहा हरकती दाखल झाल्या आहेत. ही यादी निश्चित केल्यानंतर आठ सदस्यांची निवडणूक होणार आहे.
शहर फेरीवाला समितीतील आठ अशासकीय सदस्यांसाठी पात्र फेरीवाल्यांची यादी महापालिकेने तयार केली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यादी निश्चित करण्यासाठी हरकती मागवल्या होत्या. पाच हजार ६०७ फेरीवाल्यांची संख्या आहे. त्याबाबत दहा हरकती दाखल झाल्या आहेत. त्यावर आता सुनावणी घेऊन नंतर यादी फेरीवाला समितीसमोर मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. ती मंजूर झाली की कामगार आयुक्त कार्यालयाकडे दिली जाणार आहे. त्यांच्याकडून या जागांसाठी निवडणूक जाहीर केली जाणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या पाच तसेच विविध प्रवर्गातून सात सदस्य आहेत. फेरीवाला यादी मंजूर झाल्यानंतर त्यातील पदांसाठी निवडणूक घेतली जाईल.