गड- काळभैरी यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड- काळभैरी यात्रा
गड- काळभैरी यात्रा

गड- काळभैरी यात्रा

sakal_logo
By

1) 81066
गडहिंग्लज : काळभैरी यात्रेसाठी दिवसभर डोंगरावर गर्दी झाली होती. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
...
2) 81071
गडहिंग्लज : काळभैरी यात्रेत मंदिराभोवती सबिनाचा सोहळा पाहण्यासाठी दुपारी बारा वाजता भाविकांची गर्दी झाली होती. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------

डोंगरावर भरला भक्तांचा मेळा
काळभैरी यात्रा : दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी, चांगभलंचा अखंड गजर

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ७ : येथील ग्रामदैवत आणि सीमाभागाचे श्रध्दास्थान श्री काळभैरीची यात्रा आज पारंपरिक उत्साहात साजरी झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ठप्प असलेला भक्तांचा मेळाच जणू काळभैरी डोंगरावर भरला होता. सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांची यावेळी उपस्थिती होती. मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली रांग रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. मंदिरात ‘काळभैरीच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर सुरू होता. गडहिंग्लजसह तालुक्यातील बड्याचीवाडी, बहिरेवाडी (ता. आजरा) आणि डोंगरालगतच्या हडलगे (ता. चिक्कोडी) याठिकाणीही यात्रा थाटात झाली.
येथून पाच किलोमीटर अंतरावरील बड्याचीवाडीच्या डोंगर कपारीत असणाऱ्या मंदिरात ही यात्रा झाली. रात्री बारा वाजता प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा झाली. सकाळी पाच वाजता काकडी आरती झाली. पुजारी सुरेश गुरव आणि सहकाऱ्यांनी पूजा बांधली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. सकाळच्या सत्रात दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन भाविक डोंगरावर दाखल होत होते. एमआयडीसीत वाहनतळावर गाड्या लावून भाविक मंदिराकडे जात होते.
दुपारी बारा वाजता पारंपरिक सबिनाचा कार्यक्रम झाला. पालखी आणि मानाच्या सासनकाठ्यांनी वाद्यांच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली होती. सासनकाठ्या नाचविण्यासाठी युवकांत चढाओढ रंगली होती. दर्शनाच्या सोयीसाठी लाकडी कठडे उभे करण्यात आले होते. यात्रेत शहर परिसरातील भाविकांची संख्या कमी असल्याने गर्दी अधिक दिसली नाही. गडहिंग्लजसह बड्याचवाडी, बहिरेवाडी, हडलगे येथे एकूण सुमारे चार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली.
यात्रेला जाण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब केला. जाताना लाखेनगर कमानीतून, तर येताना एमआयडीसीमार्गे वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडी झाली नाही. यंदा तात्पुरते बसस्थानक एमआयडीसीऐवजी पूर्वीप्रमाणे डोंगरालगत मंदिराच्या कमानीशेजारी उभारण्यात आले होते. खासगी दुचाकी, चारचाकी गाड्या एमआयडीसीतील वाहनतळावर थांबविण्यात आल्या. दहा अधिकाऱ्यांसह दीडशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. माजी सैनिक संघटनेने पिण्याच्या पाण्यासाठी स्टॉल उभारला होता. आपत्कालीन सेवेसाठी अँब्युलन्स, वैद्यकीय पथक कार्यरत होते. बड्याचीवाडी ग्रामपंचायतीने स्वागत कक्ष उभारला होता. खेळणीची दुकाने, पाळणे याठिकाणी बच्चे कंपनीची गर्दी होती. सायंकाळी चारनंतर पुन्हा गर्दीत वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी डोंगर फुलून गेला होता.
...

प्रशासनाचे यशस्वी नियोजन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे यात्रा रद्द झाली होती. परिणामी, वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने राबविलेले नियोजन यशस्वी ठऱले. यात्रास्थळी खाद्यपदार्थांचे स्टॉल रस्त्यापासून दूर ठेवल्याने भविकांची गर्दी कमी होण्यास मदत झाली. वाहतुकीपासून दर्शनापर्यंत भाविकांची चांगली सोय झाली.