
चंदगड ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव
chd72.jpg
81086
चंदगड ः सकाळ संपर्क कार्यालयाच्या वर्धापनदिनी सकाळचे वृत्त संपादक तानाजी पोवार यांना माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
------------------------------
चंदगड ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव
विविध स्तरांतील मान्यवरांची उपस्थिती, जैवविविधता विशेषांकाचे सर्वांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ ः येथील सकाळ संपर्क कार्यालयाचा वर्धापन दिन सोमवारी (ता. ६) साजरा झाला. यानिमित्ताने श्री देव रवळनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या जैवविविधता विशेषांकाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.
सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत चाललेल्या मेळाव्यात तालुक्याच्या विविध भागांतील वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वितरक आदींनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. पाटणे येथील वयोवृद्ध वसंत सोनार यांनी ‘सकाळ’मधील विविध सदरे आणि महत्त्वपूर्ण माहिती संकलित करून तयार केलेल्या विविध पुस्तकांच्या स्टॉलला वाचकांनी प्रतिसाद दिला. आमदार राजेश पाटील यांनीही या स्टॉलला भेट देऊन कौतुक केले. र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी इंदूताई कांबळे, रसिका पाटील, तेजस्विनी कांबळे, दर्शना माळी, रुपाली म्हसकर, शीतल पाटील यांनी कार्यक्रमस्थळी रेखाटलेली संस्कारभारती रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली.
फोनवरून शुभेच्छा दिलेले ः माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अथर्व इंटरट्रेडचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, अॅड. संतोष मळवीकर, निवृत्त डीवायएसपी फुलचंद चव्हाण, सुभाष केसरकर, दिनकर शिप्पूरकर, राजेंद्र शिवणगेकर, उमर पाटील, महादेव पोवार, अशोक पेडणेकर, आर. एस. वाघमारे, राहुल पाटील, राहुल टोपले, धुमडेवाडीचे सरपंच रामकृष्ण पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत गावडे, दीपक कुपन्नावर, छोटुसिंग साळुंखे, शंकर कुरबेट्टी, सुभाष पोवार कोवाडे, राम मगदूम, विश्वास पाटील सावर्डे, लीला तावदारे, उदय इंदलकर, मोहन परब, भास्कर कामत, प्रशांत शेंडे, शेखर म्हापणकर, बी. ए. पाटील, श्रीकांत देसाई, खंडेराव देसाई, एस. के. सावंत, सुनील दिवटे, इफ्तीकार मुल्ला, संदीप तारीहाळकर, रमेश भोसले महिपाळगड, दीपक कालकुंद्रीकर, आर. पी. कांबळे, फिरोज मुल्ला कोवाड, रमेश देसाई-गवसे, महादेव पाटील गुडेवाडी, रणजित गावडे, दत्ता मोरसे, सुभाष सावंत महिपाळगड, गुरुदत्त फडणीस, संजय पाटील सुंडी, मल्लिकार्जुन मुगळी, प्रा. भूपाल दिवेकर, सुभाष गवळी, श्रीधर गिजवणेकर, विवेक पाटील, अजित देसाई, संजय कुंभार कोल्हापूर, आर. टी. झाजरी.