शहरातील दुर्मिळ वृक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील दुर्मिळ वृक्ष
शहरातील दुर्मिळ वृक्ष

शहरातील दुर्मिळ वृक्ष

sakal_logo
By

शहरात २३५ दुर्मिळ वृक्ष
कोल्हापूर, ता. ७ ः शहरातील विविध भागांत खासगी तसेच शासकीय जागांवर अतिदुर्मिळ, दुर्मिळ वृक्ष आहेत. यापूर्वीच्या पाहणीतून त्यांची नोंद झाली होती. मात्र, महापालिकेने ती यादी पुन्हा तयार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षीपासून उद्यान विभागाने प्रत्यक्ष पाहणी तसेच मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अतिदुर्मिळ, दुर्मिळ तसेच जास्त वयाच्या २३५ वृक्षांची नोंद केली आहे.
शहराचा पर्यावरणीय अहवाल तयार केलेला नाही. तसेच वृक्ष गणनाही रखडलेली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी सातत्याने मागणी करूनही महापालिकेने कार्यवाही केलेली नाही. काही पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांनी केलेल्या पाहणीतून दुर्मिळ वृक्षांची यादी तयार केली होती. ती जुनी असल्याने ती अद्ययावत होणे गरजेची होती. त्यानुसार शहराची वृक्षगणना होण्याची प्रतीक्षा न करता उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती यादी अद्ययावत करण्यास सुरुवात केली. प्रत्येकी दोन विभागीय कार्यालयांना एक सहाय्यक अधीक्षक आहे. त्यांनी पर्यावरणप्रेमी, वनस्पतीतज्ज्ञांकडून माहिती घेऊन झाडांची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरुवात केली. वर्षभरापासून ही पाहणी सुरू असून, आतापर्यंत २३५ वृक्षांची नोंद झाली आहे. यावेळी झाडाचे नाव, शास्त्रीय नाव, देशी आहे की विदेशी, कोणत्या परिसरात वा ठिकाणी आहे, खासगी जागेत आहे की शासकीय जागेत आहे, त्याचे जीपीएस लोकेशन अशी माहिती घेतली आहे.

चौकट
काही देशी वृक्ष
पांढरा कांचन, वड, सीता अशोक, जारूळ, तांबडा नागचाफा, भोकर, पळस, पुत्रंजीवी, सुकाणू, तामण, कदंब आदी.
-
चौकट
काही विदेशी वृक्ष
समुद्रफळ, फर्न ट्री, पिवळा टॅब्युबिया, दिवी दिवी, कैलासपती, नोनीफळ, वाडग्याच झाड, पांढरा बॉटल ब्रश आदी.
-
चौकट
विभागीय कार्यालयनिहाय नोंद
विभाग क्र-१ व २ - ११० वृक्ष
विभाग क्र-३ व ४ - १२५ वृक्ष