
वातावरणातील बदलावर सांगोपांग चर्चा
81220
...
जिल्हा परिषदेत वातावरणातील
बदलावर सांगोपांग चर्चा
कोल्हापूर : वातावरणीय बदलाचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत आहे. विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या सर्वाला तोंड देण्यासाठी एकसंघपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हवामान बदल, तसेच आरोग्याशी निगडित तज्ज्ञांनी केले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत डॉ. प्रेमचंद्र कांबळे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. योगेश साळे, डॉ. रणवीर, डॉ. आसावरी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील व नागरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तसेच ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक या कार्यशाळेस उपस्थित होते. वातावरणातील बदलामुळे उद्भवणाऱ्या आजारांना कशा पद्धतीने तोंड देता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाने ठरवलेल्या उद्दिष्टांची माहिती देण्यात आली. यात हरित आरोग्य संस्था विकसित करणे, पंचायत राज संस्थांतील पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, राज्य व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी करणे, विविध माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करणे यावर चर्चा करण्यात आली.