बदलीनंतरही ग्रामसेवकांचा गांधीनगरातच ठिय्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलीनंतरही ग्रामसेवकांचा गांधीनगरातच ठिय्‍या
बदलीनंतरही ग्रामसेवकांचा गांधीनगरातच ठिय्‍या

बदलीनंतरही ग्रामसेवकांचा गांधीनगरातच ठिय्‍या

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

बदलीनंतरही ग्रामसेवकांचा
गांधीनगरातच ठिय्‍या

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍नी दिले चौकशीचे आदेश

कोल्‍हापूर, ता. ७ : भामटे (ता. करवीर) येथील ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी यांची चंदगड तालुक्यातील कोळींद्रे या ठिकाणी बदली करण्यात आली. मात्र, परस्‍परच ते गांधीनगर येथे काम करत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, श्री. सूर्यवंशी यांची आठ महिन्यांपूर्वी भामटे येथून कोळींद्रे येथे बदली झाली आहे. मात्र, ते कोळींद्रे येथे हजर न होता गांधीनगरचे कामकाज पाहत आहेत. सूर्यवंशी यांच्या बदलीचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २४ मे २०२२ रोजी दिले होते. यामध्ये ३१ मे पर्यंत भामटे येथे व तेथून पुढे कोळींद्रे येथे काम करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, गेले आठ महिने ते कोळींद्रे खालसा येथे हजर झालेले नाहीत. तसेच गांधीनगर येथे कार्यरत राहण्याचा कोणताही आदेश त्यांना देण्यात आलेला नाही. असे असताना ते गांधीनगर येथे कार्यरत राहिलेच कसे, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. ही सर्व माहिती अशोक चंदवाणी यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे.