
‘जेईई’ परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश
‘जेईई’ मेन परीक्षेत
कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर, ता. ७ ः एनटीए आणि आयआयटी या शैक्षणिक संस्थांतील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मेनच्या पहिल्या सत्राचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. हे विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. जेईई मेन्स परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली. त्याचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरमधील सुमारे दोनशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये रमा देशपांडे (९८.२४ पर्सेंटाईल), अमेय हेर्लेकर (९८.१३ पर्सेंटाईल) यांचा समावेश आहे. ते पेठेज् ॲकॅडमीचे विद्यार्थी आहेत. जेईई मेनच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा ६ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.