शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षा
शिक्षा

शिक्षा

sakal_logo
By

81242
...
विनयभंग करणाऱ्या तरुणाला
दोन वर्ष सक्तमजुरी, २५ हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः महिलेचा विनयभंग करणाऱ्या भुदरगडमधील तरुणास आज न्यायालयाने दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. स्वप्नील रामचंद्र घोडके (वय ३०, रा. शेणगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना यांनी ही शिक्षा सुनावली.
शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील आरोपीने ५ ऑक्टोबर २०२० ला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक असा मोटारसायकलवरून फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. त्यांच्याजवळ येऊन त्यांना हाक मारली. तसेच फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घोडकेवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
शाहूपुरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक डी. एस. पाटील यांनी तपास केला होता. न्यायालयात सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती आम्रपाली कस्तुरे यांनी काम पाहिले. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. एम. कळंत्रे यांनी काम पाहिले.