Gag81_txt.txt

Gag81_txt.txt

81247
सांगशी : पंधराशे वर्षांपूर्वीचा सांगसाई मंदिरातील शिलालेख.

सांगशीतील अतिप्राचीन शिलालेख दुर्लक्षित 
गगनबावडा, ता. ८ ः देशातील प्राचीन शिल्पकलेकडे कसे दुर्लक्ष करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवरील गगनबावडा तालुक्यातील सांगशीच्या मंदिरातील प्राचीन शिलालेख. हा शिलालेख ग्रॅनाईट दगडावर ब्राम्ही लिपीत आहे.
पाचव्या शतकातील चालुक्य राजा मंगलेश याने पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला हा शिलालेख म्हणजे प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ केलेले जगातील पहिले स्मारक आहे. शाहजहानाने राणी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल चारशे वर्षांपूर्वीचा, तर राजा मंगलेशने बांधलेले स्मारक पंधराशे वर्षांपूर्वीचे प्राचीन आहे. या प्राचीन शिलालेखाचे संशोधन प्रथम १९८३ मध्ये डॉ. जे. एफ. फ्लिट यांनी केले. पी. बी. देसाई, रा. प. पंडित यांनी संशोधन करून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. याचे प्राचीनत्व कन्नड विद्यापीठ; हम्पीने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात मान्य केलेले आहे. हा दुर्मिळ अतिप्राचीन शिलालेख दुर्लक्षित आहे. याबाबत पुरातत्व विभागाकडे ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित व्हावे, अमूल्य ठेवा जतन व्हावा, म्हणून ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर फेब्रुवारी २०१३ मध्ये पाहणी झाली. पुन्हा शासनास विसर पडला. शासनाने त्वरित लक्ष घालून हा दुर्लक्षित अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com