इचल ः उद्या मुनी दिक्षा

इचल ः उद्या मुनी दिक्षा

Published on

इचलकरंजीत उद्या दिगंबर
मुनी दिक्षा सोहळा

इचलकरंजी : येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या सहकार्याने व श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (कागवाडे मळा) यांच्या वतीने दोन श्रावकांचा भव्य दिगंबर मुनी दिक्षा सोहळा होणार आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. १०) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. जगद्‌गुरु गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागर महाराज यांच्या सानिध्यात व त्यांचे परमशिष्य आचार्य श्री पद्मनंदिजी महाराजा यांच्या हस्ते ही दिक्षा दिली जाणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी सुरू असून संपूर्ण आचार्य संघ कागवाडे मळा येथील त्यागी भवन येथे वास्तव्यास आहे.
मुंबई येथील प्रतिष्ठाचार्य पंडित महिपाल शहा आणि राजकुमार गांधी या दोन्ही श्रावकांची मुनी दिक्षा या वेळी होणार आहे. या वेळी आचार्य श्री विद्यानंदी महाराज, आचार्य श्री निश्चयसागर महाराज यांच्यासह नांदणी संस्थान मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व कोल्हापूर संस्थान मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी उपस्‍थित राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.