घरफाळा भरुनही जप्तीपूर्ण नोटीस

घरफाळा भरुनही जप्तीपूर्ण नोटीस

Published on

घरफाळा भरुनही जप्तीपूर्ण नोटीस
महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर; मिळकतधारकाला मानसिक त्रास

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : महापालिकेचा सर्व घरफाळा भरला असतानाही थकीत दाखवला आहे. सात दिवसात ३ लाख २० हजार २४७ रुपये न भल्यास वॉरंट काढून वसुल केले जाईल. तसेच, संबंधित प्रॉपर्टी कार्डवर थकबाकीचा बोजा चढवला जाईल, अशी नोटीस विक्रमनगर येथील मिळकत धारकाला मिळाल्याने धक्का बसला आहे. घरफाळा भरल्यानंतरही नोटीस का दिली? हे विचारायला गेलेल्या रामचंद्र कुंभार यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याने महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
विक्रमनगर येथील कुंभार यांचा ७७ हजार ६१८ रुपये थकीत घरफाळा होता. कुंभार यांच्या वारसांनी २०१७ मध्ये सर्व घरफाळा भरला आहे. त्यानंतर हाच घरफाळा भरावा यासाठी महापालिकेने १५ जानेवारी २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये अशा दोन नोटीस पाठवली. त्यामुळे, श्री कुंभार करदाता क्रमांक १८५८३१ या मिळकतीचा घरफाळा नियमित भरत आहे. त्यांच्या मिळकतीवर दुबार घरफाळा येत आहे. तो रद्द करावा यासाठी सुभाष कुंभार यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये घरफाळा विभागाच्या कर निर्धारक संग्राहकांना अर्ज दिला होता. तशी पोचही घेतली आहे. यानंतर नोटीस येणे बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, २ फेब्रुवारी २०२३ ला मालमत्ता कराची थकीत १ लाख २१ हजार ९४९ रुपये व ३१ जानेवारी २०२३ पर्यंत होणारी १ लाख ९८ हजार २९८ रुपये दंडाची रक्कम अशी एकूण ३ लाख २० हजार २४७ रुपये रक्कमेचा घरफाळा तत्काळ भरावा. घरफाळा न भरल्यास मालमत्तेवर हा बोजा चढवला जाईल, अशी जप्तीपूर्ण नोटीस पाठवली आहे.
....
कोट
करदाता क्रमांक बदलला असेल तर तो अपडेट करुन घ्यावा लागेल. जुन्या इमारतीचे नवीन बांधकाम किंवा विभागणी झाली असल्यास जुना आणि नवा करतादा क्रमांक असू शकतो. त्यामुळे त्याची चौकशी करुन दुरुस्ती केली जाईल.
सुधाकर चल्लावाढ, कर निर्धारक, महापालिका.
...
कोट
दुबार घरफाळा येत असल्याबाबत दोन वर्षापासून अर्ज करत आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. एकच मिळकत आहे. यामध्ये कोणताही बदल नाही. तरीही नाहक त्रास देण्याचे काम केले जात आहे.
-सुभाष रामचंद्र कुंभार, मिळकतदार
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.