सुंदर गाव स्‍पर्धेत पोखलेची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुंदर गाव स्‍पर्धेत पोखलेची तपासणी
सुंदर गाव स्‍पर्धेत पोखलेची तपासणी

सुंदर गाव स्‍पर्धेत पोखलेची तपासणी

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

सुंदर गाव स्‍पर्धेची तपासणी अंतिम टप्‍प्यात

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ८ : आर. आर. पाटील जिल्‍हा सुंदर गाव स्‍पर्धेंतर्गत गावांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. पन्‍हाळा तालुक्यातील काखे गावची मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्‍ही. टी. पाटील यांच्या समितीने नुकतीच तपासणी केली.

सुंदर गाव स्‍पर्धेत सन २०२०-२१ च्या कामकाजावर आधारित सन २०२१-२०२२ साठी तालुक्यांनी ग्रामपंचायतींची शिफारस केली आहे. ‘तालुका सुंदर गाव’ म्‍हणून ज्या गावांची घोषणा करण्यात आली आहे, त्यातूनच ‘आर. आर. पाटील जिल्‍हा सुंदर गाव’ म्‍हणून निवड केली जाणार आहे. तत्‍पूर्वी या पुरस्‍कारासाठी पुनर्मूल्यांकन करण्यासाठी जिल्‍हास्‍तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍च्या अध्यक्षतेखालील ही समिती तालुक्यातील संबंधित गावांना भेटी देत आहे. आतापर्यंत दुर्गेवाडी (ता. हातकणंगले), शिरोळ (ता. धरणगुत्ती), वाटंगी व मासेवाडी (ता. आजरा) या गावांची तपासणी करण्यात आली आहे.