आजरा ः कवितासंग्रह पुरस्कार बातमी

आजरा ः कवितासंग्रह पुरस्कार बातमी
Published on

ajr82.txt
ajr82.jpg....

81431
सातारा ः मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. डाॅ. आनंद बल्लाळ.
................
डाॅ. बल्लाळ यांच्या कवितासंग्रहास
शिविम ललित साहित्य पुरस्कार
आजरा, ता. ८ ः प्रा डॉ आनंद बल्लाळ यांच्या ''स्वातंत्र्यानंतर आजही...'' या कवितासंग्रहास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांचा ललित साहित्य पुरस्कार दिला आहे. ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक स्वामी यांच्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी उत्कृष्ट ललित साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा यांच्यावतीने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि शिविमचे अधिवेशन सातारा येथे झाले. उदघाटन सत्रात सातारा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बल्लाळ यांना पुरस्कार दिला. यावेळी लोकसाहित्यांच्या अभ्यासक आणि अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. नीला जोशी अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी विचारवंत किशोर बेडकिहाळ, डॉ. मेघा पानसरे, शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, भाषातज्ञ डॉ. अनिल गवळी, शिविमचे अध्यक्ष डॉ. प्रकाश दुकळे, सचिव डॉ. रमेश साळुंखे, प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे, कार्यालय अधिक्षक योगेश पाटील तसेच प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.