स्मशानभूमीत गर्दी

स्मशानभूमीत गर्दी

Published on

पंचगंगा स्मशानभूमीवर
रक्षाविसर्जनासाठी गर्दी

कोल्हापूर, ता. ८ ः तीन दिवसांपासून थांबलेले रक्षाविसर्जन करण्यासाठी आज सकाळी पंचगंगा स्मशानभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. ३६ रक्षाविसर्जन असल्याने झालेल्या गर्दीमुळे स्मशानभूमीच्या आवारात उभे रहायलाही जागा नव्हती.
शनिवारी रात्रीपासूनच्या पौर्णिमेमुळे अनेक नातेवाईकांनी रविवारपासून मंगळवारपर्यंत रक्षाविसर्जन केले नव्हते. सोमवारी काही रक्षाविसर्जन केल्यामुळे मंगळवारी अंत्यसंस्काराला जागा मिळाली. पण, रात्री जागा संपल्यामुळे दोन मृतदेह इतर ठिकाणी पाठवले. आज सकाळी तीन दिवसांपासून राहिलेल्या रक्षाविसर्जनासाठी नागरिक आले. आठ वाजल्यापासून दहापर्यंत ३६ रक्षाविसर्जन केले. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात मोठी गर्दी झाली. त्यामुळे इतर गावाहून येणाऱ्या नातेवाईकांना ठिकाण समजण्यात अडचणी आल्या.
आवारातील जागेत उभे रहायलाही जागा नसल्याने अनेकजण बाहेरील रस्त्यावर उभे होते. स्मशानभूमीसमोरील रस्त्यावर वाहने लावली असल्याने थोड्या वेळाने येणाऱ्या नातेवाईकांना दूर वाहने लावून चालत यावे लागत होते. त्यामुळे शिवाजी पूल, सिद्धार्थनगर परिसरातही मोठ्या संख्येने वाहने उभी होती. स्मशानभूमीतील नियोजनासाठी दोन शिफ्टमधील महापालिकेचे कर्मचारी थांबून होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.