इस्पुर्ली अल्पवयीन मुलगी प्रसुती

इस्पुर्ली अल्पवयीन मुलगी प्रसुती

Published on

अल्पवयीन मुलीची प्रसूती; पतीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ः ऊस तोडणीसाठी धुळे जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या कुटुंबीयांतील अल्पवयीन मुलगी आज येथे प्रसूत झाली. तिला मुलगी झाली आहे. या प्रकरणी इस्पुर्ली पोलिसांनी तिच्या पतीवर बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल, अशी माहिती ईस्पुर्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली. याबाबतची नोंद सीपीआर पोलिस चौकीतही झाली.
पोलिसांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांचे कुटुंबीय मजुरीसाठी गिरगाव (ता. करवीर) येथे येऊन राहिले आहे. मंगळवार(ता.७) सकाळी पोटात दुखू लागल्याने मुलीला(पत्नी) पतीने गिरगाव ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी तेथून पुन्हा कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. आज दुपारी पुन्हा तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तिची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. तेव्हा सीपीआर प्रशासनाकडून तिच्याकडील आधार कार्डची मागणी केली. त्या आधारकार्डची पडताळणी केली, तेव्हा तिचे वय १३ वर्षे तीन महिने १९ दिवस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अल्पवयीन मुलीशी लग्न करून अर्भकास जन्मास घातल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
---

‘ऊस तोडणी कामागारांचे हे कुटुंब आहे. अल्पवयीन असतानाही विवाह करून अर्भकास जन्म दिला आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये त्यांचा जाबजबाब घेण्याचे काम ईस्पुर्ली आणि करवीर पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी करीत आहेत. हा जाबजबाब पोलिस अधीक्षक यांना दाखविल्यानंतरच प्रत्यक्षात गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.’

विकास बडवे, प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.