शिवराज महाविद्यालयात विद्यार्थी, पालकांचा गौरव

शिवराज महाविद्यालयात विद्यार्थी, पालकांचा गौरव

Published on

gad91.jpg
81565
गडहिंग्लज : शिवराजतर्फे विविध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी डॉ. अनिल कुराडे, डॉ. महेश चौगुले, डॉ. डी. के. कांबळे आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
शिवराज महाविद्यालयात
विद्यार्थी, पालकांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : येथील शिवराज महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थी व पालक मेळावा झाला. नेसरीचे प्रा. डॉ. डी. के. कांबळे अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यात संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्याहस्ते डिसेंबर २०२२ मधील सी.ए., सी.एम.ए., सी. एस. फाउंडेशन, सी. ए. इंटर परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचाही सत्कार झाला.
सेबेस्टीना बारदेस्कर, प्राजक्ता कांबळे, सिद्धी गिलबिले, शुभम पाथरवट, निखील मुळे, मानसी गुरव, प्राप्ती देसाई, साक्षी चौगुले, रेवती चौगुले, सृजन कुलकर्णी, ज्योती सावंत, स्वीटी बारदेस्कर, पल्लवी राजगोळकर, सुप्रिया पाटील, प्राजक्ता चोथे, अंकिता चोथे, साक्षी देसाई, साक्षी कुलकर्णी, सुमित चव्हाण, अवधूत यादव, सुशांत पाटील, सुमित पाटील, मीनल बारदेस्कर, समृद्धी गेंगे या २४ विद्यार्थी व पालकांचा गौरव झाला. करंबळी ग्राम पंचायतीच्या नूतन सदस्य प्रा. तेजस्विनी पाटील यांचाही सत्कार झाला. संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शिवराजचे बहुसंख्य विद्यार्थी या नामांकित परीक्षेत उत्तीर्ण होणे भूषणावह असल्याचे सांगितले. शिवराजमध्ये लवकरच स्वतंत्र वाणिज्य महाविद्यालय सुरु करणार असल्याचेही जाहीर केले. प्रा. डॉ. कांबळे, गणपत पाथरवट, अजित वंटमुरे, प्रा. नाझीया बोजगर, प्रा. तेजस्विनी पाटील, विद्यार्थिनी साक्षी देसाई, मानसी गुरव आदींनी मनोगत व्यक्त केले. इंग्लिश विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. महेश चौगुले यांनी संयोजन केले. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. प्रा. बियामा वाटंगी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.