‘रवळनाथ’तर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण

‘रवळनाथ’तर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण

Published on

‘रवळनाथ’तर्फे महिलांसाठी
उद्योजकता विकास प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : राष्ट्रीय सहकारी संघ व श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज शहर व परिसरातील महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. १९ फेब्रुवारी ते ८ मार्च अखेर गडहिंग्लजमध्ये हे शिबीर होईल, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘महिलांमध्ये उपजतच अनेक कौशल्य व प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्याला कौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड दिल्यास संबंधित महिलांचा पर्यायाने समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. म्हणून संस्थेने हा महत्वांकाक्षी उपक्रम हाती घेतला आहे. प्रामुख्याने दारिद्रय रेषेखालील महिला व बेरोजगार युवतींसाठी हे प्रशिक्षण आहे. महाविद्यालयीन युवती, बचत गटातील महिला, उत्पादक सहकारी संस्थांच्या सभासदांनाही याचा लाभ घेता येईल. दोन्ही शिबिरातून ८० महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छूक महिला व युवतींनी माहितीसाठी झेप अकॅडमीच्या अधीक्षिका गौरी बेळगुद्री, सौ. प्रज्ञा पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.