खासदार,आमदारांच्या याद्या सादर

खासदार,आमदारांच्या याद्या सादर

Published on

लोगो- जिल्‍हा परिषद

खासदार, आमदारांच्या याद्या सादर
-
जिल्‍हा नियोजन निधी वाटपाला मुहूर्त

कोल्‍हापूर, ता. ९ : जिल्‍हा नियोजन मंडळाच्या निधी वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सध्या तरी खासदार, आमदार यांच्याच कामांना प्राधान्याने मंजुरी दिली जाणार आहे. जनसुविधा, नागरी सुविधाअंतर्गत सुचवलेल्या कामांच्या मंजुरीची जिल्‍हा परिषदेत लगबग सुरू आहे. विकासकामांसाठी या लोकप्रतिनिधींनी प्रत्येकी २ कोटी रुपये दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप व शिंदे गटास प्रत्येकी ४० टक्‍के निधी दिला जाणार असून, उर्वरित २० टक्‍के निधी विरोधकांना दिला जाणार असल्याची चर्चा जिल्‍हा परिषदेत सुरू आहे.
ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्‍हा परिषदेकडे जनसुविधा, नागरी सुविधा, नावीन्यपूर्ण योजना तसेच दलित वस्‍तीचा विकास या महत्त्‍वपूर्ण योजना आहेत. यांतीलही जनसुविधा, नागरी सुविधा या सर्वाधिक लोकप्रिय व कंत्राटदारप्रिय योजना आहेत. पूर्वी या योजनांमध्ये जिल्‍हा परिषद सदस्यांचा वरचष्‍मा राहत होता. आता प्रशासक असल्याने खासदार, आमदार व सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनीच या निधीवर आक्रमण केले आहे. जिल्‍हा नियोजन समिती सदस्यांची निवड केली असली तरी त्यांनाही अजून निधी दिलेला नाही.
जिल्‍हा नियोजनमधून भाजप, शिंदे गटास प्रत्येकी ४० टक्‍के निधी दिला जाणार आहे. पालकमंत्री यांच्यासाठी १० टक्‍के निधी राखीव ठेवण्याचे नियोजन केले होते; मात्र भाजपने त्यास आक्षेप घेतला. असे झाले असते तर शिंदे गटास ५० टक्‍के व भाजपला ४० टक्‍के निधी मिळाला असता; मात्र आता समसमान निधी देण्याचे धोरण ठरवण्यात आल्याचे एका सदस्याने स्‍पष्‍ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.