संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदन

संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदन

Published on

81665
कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडतर्फे शिवराज नायकवडी यांना निवेदन देताना उपस्थित सदस्य.

‘जोतिबा डोंगरावरील बंद केलेले
व्यवसाय तातडीने सुरू करा’

कोल्हापूर, ता. ९ : जोतिबा डोंगरावरील बंद केलेले व्यवसाय तातडीने सुरू करा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल, असे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांना देण्यात आले. नायकवडी यांनी फेरीवाल्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन केले तर तत्काळ विचार करू, असे सांगितले.
पौर्णिमा, यात्रेवेळी लाखो भाविक येतात. जोतिबा मंदिरानजीक यमाई मंदिराशेजारी ३० ते ३५ फेरीवाले अनेक वर्षांपासून देवस्थान समितीला भाडे देऊन उदरनिर्वाह चालवतात. अचानक तीन दिवसांपूर्वी या फेरीवाल्यांना मंदिराजवळ व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली. देवस्थान समितीला जागा भाडे देऊन आणि ग्रामपंचायतीला भाडे देऊन व्यवसाय करणाऱ्या या फेरीवाल्यांना कोणत्या तरी राजकारणातून व्यवसाय करू दिला जात नाही. देवस्थान समिती फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्‍न संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी केला.
फेरीवाल्यांना व्यवसायाची जागा निश्चित करून त्याचे व्यवस्थापन आणि वाटप समान पद्धतीने करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आला. यावेळी रवींद्र उपारे, विकास भिऊंगडे, भगवान कोइगडे, उदयशंकर घाडगे, चारुशीला पाटील, भारती पाटील, राणी पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.