आरोग्य तपासणी

आरोग्य तपासणी

Published on

महाआरोग्य शिबिरात
७७९ नागरिकांची तपासणी
कोल्हापूर, ता. ९ : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयामधील महाआरोग्य शिबिरात ७७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले रुग्णालय व नागरी आरोय केंद्र एकमधील शिबिरात ३४८ नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव यांनी भेट दिली. डॉ. मंजुश्री रोहिदास, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. रूचिका यादव, डॉ. परशुराम कदम, डॉ. आशा जाधव, डॉ. स्वप्नील जाधव, डॉ. राहुल पाटील, डॉ. दिग्वीजय पाटील, डॉ. अमर पवार, डॉ. आदित्य काशीद, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. विक्रांत साळोखे, डॉ. अनिरुद्ध काळेबेरे यांनी तपासणी केली.
पंचगंगा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिबिरात ४३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. उपायुक्त शिल्पा दरेकर, पुष्कराज क्षीरसागर, डॉ. विद्या काळे-हेरवाडे उपस्थित होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्यासाठी डॉ. संजना बागडी, डॉ. रूक्सार मोमीन यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.