हिंदू जनजागृती सभा १२ फेब्रुवारीला

हिंदू जनजागृती सभा १२ फेब्रुवारीला

Published on

हिंदू राष्ट्र जागृती सभा रविवारी ः दुसे
कोल्हापूर ः हिंदू समाजाच्या विविध प्रश्नासंबंधी जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचे आयोजनकेले आहे. ही सभा रविवारी (ता.१२) सायंकाळी ६ वाजता खरी कॉर्नर येथील पद्माराजे हायस्कूल येथे होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक किरण दुसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दुसे म्हणाले, ‘भारत हा धर्मनिर्पेक्ष असल्याचे सांगितले जाते. पण, देशात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि हलाल जिहाद जोरात सुरू आहे. हिंदू मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे पण चर्च आणि मशिदींवर नाही. अल्पसंख्याक म्हणून त्यांच्या विकासासाठी शासनाचे विविध आयोग-मंत्रालय आहे. पण हिंदूंसाठी कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचे आयोजन केले आहे.’ शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) करवीर तालुका प्रमूख राजू यादव, समितीच्या रणरागिणी शाखेच्या राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ.मानसिंह शिंदे हे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.