रुग्‍णाचा उडी घेवून मृत्यू

रुग्‍णाचा उडी घेवून मृत्यू

Published on

81650
रुग्णालयावरून उडी मारून
रुग्णाची आत्महत्या
कोल्हापूर, ता. ९ ः आजाराला कंटाळून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने आज आत्महत्या केली. जयसिंग नामदेव कणसे (वय ४८, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) असे त्यांचे नाव आहे. लक्ष्मीपुरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे हा प्रकार घडल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की कणसे मूळचे साताऱ्याचे आहेत. ते, नोकरीच्या शोधात पुलाची शिरोली येथील एमआयडीसीमध्ये आले होते. त्यामुळे सध्या शिरोली पुलाची येथेच राहतात. त्यांना वारंवार धाप लागते. त्यांनी शिरोली येथे उपचार घेतले. त्रास वाढू लागल्यामुळे त्यांना लक्ष्‍मीपुरी येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असतानाही त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना त्रास असहाय्य होत होता. त्यामुळे आज पहाटे त्यांनी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. त्यांच्या डोके आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यातच कणसे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कणसे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. याबाबत कोणाची तक्रार नसल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे आणखी कोणते कारण आहे काय, याचाही तपास करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.