दोन बातम्या आर्थिक फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन बातम्या  आर्थिक फसवणूक
दोन बातम्या आर्थिक फसवणूक

दोन बातम्या आर्थिक फसवणूक

sakal_logo
By

गुंतणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

कोल्हापूर, ता. ९ ः जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. रेश्मा नदाफ (वय ४५, रा इचलकरंजी) आणि तिचा साथीदार शब्बीर मकानदार (वय ५०, रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १४ कोटी ३९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुंतवणुकीवर कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यातून नदाफ आणि मकानदार या दोघांनी ग्रामीण भागातील हजारो लोकांकडून पैसे घेतले. विश्‍वास संपादनासाठी सुरुवातीला काहींना जादा परतावा दिला. त्यानंतर मोठ्या रकमा घेऊन दोन्ही संशयित जिल्ह्याबाहेर पळाले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राधानगरी, इचलकरंजी, मुरगूड पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान, फसवणुकीची व्याप्ती वाढली होती. त्याचा संदर्भ घेवून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला. तपास सुरू असताना पोलिसांनी ठाणे येथील एका हॉटेलमधून रेश्मा नदाफ आणि तिच्या साथीदाराला अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे. त्यांनी हजारो गुंतवणूकदारांची सुमारे १४ कोटी ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
--
‘ए.एस. ट्रेडर्स’ संचालकांच्या
अटकपूर्व जामीनावर सुनावणी

कोल्‍हापूर, ता. ९ ः ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या संचालकांची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीच्या अर्जावर सुनावणीत आज
न्यायाधीश पी. एस. सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये संशयितांतर्फे ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. श्रीकांत जाधव (सांगली) यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्ती संबंधित कंपनीच्या संचालक नाहीतच, अशी भूमिका संशयितांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान घेतली.
दरम्यान सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी त्यावर आक्षेप घेऊन अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शवला आहे. पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीस होणार आहे. गुंतवणूकदारांची फस‌वणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील संशयितांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.