जागा मोजणीवरून वाद

जागा मोजणीवरून वाद

Published on

माऊली चौकातील आरक्षित
जागेच्या मोजणीला विरोध
कोल्हापूर ः राजारामपुरीतील माऊली चौकातील आरक्षित जागेच्या मोजणीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. या जागेतील काही भाग विकला गेला असून, त्यासाठी परगावच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे घेतले आहेत अशी चर्चा घटनास्थळी होती.
माऊली चौकात केएमटी उपक्रमासाठी एक जागा आरक्षित ठेवली आहे. त्या जागेजवळ अतिक्रमणे असून काही व्यावसायिक त्या जागेचा वापर करतात. या जागेचा वाद न्यायालयातही सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज सकाळी काहीजण त्या जागेच्या मोजणीकरिता आले होते. त्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले. ही जागा समाजाची असून कुणीही मालक नाही. त्यामुळे विकण्याचा प्रश्‍न नाही. ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यांच्याशी चर्चा करा असे सांगत मोजणी करण्यास विरोध केला. तिथे जमलेल्या मोठ्या जमावामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने मोजणीकरिता आलेले परत गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.