कार्बन फुट प्रिंट, वैश्‍विक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी बहूपयोगी बाभूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्बन फुट प्रिंट, वैश्‍विक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी बहूपयोगी बाभूळ
कार्बन फुट प्रिंट, वैश्‍विक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी बहूपयोगी बाभूळ

कार्बन फुट प्रिंट, वैश्‍विक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी बहूपयोगी बाभूळ

sakal_logo
By

लोगो-
विशेष
-

81720
-

बाभूळ काटेरी... कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी....
कोल्हापूर, ता. १२ : वैश्‍विक तापमानवाढीचा फटका कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला बसत आहे. ही तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करणे आवश्‍यक आहे. हा कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त शोषून घेण्याची क्षमता बाभूळ वृक्षामध्ये अधिक आहे. मात्र, बाभळीला वाढू दिले जात नाही. जगवले जात नाही. ती काटेरी आहे, बाभळीखाली पीक चांगले येत नाही म्हणून बागायती, जिरायती शेतीत वाढू दिले जात नाही.


कार्बन फूटप्रिंट/कार्बन क्रेडिटसाठी सर्वाधिक उपयोग
कार्बन फूटप्रिंट/कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी बाभळीचा सर्वाधिक उपयोग होतो. पाने, फुले, फळे, लाकडात शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड हा कार्बन क्रेडिटमध्ये परावर्तीत होतो. म्हणजे, कार्बन डायऑक्साईड अधिक शोषून घेत असल्यामुळे बाभळीचे लाकूड अतिकठीण, टिकाऊ होते. असे हे लाकडू गुऱ्हाळातील मुसळे, नांगर, कुळवाची दिंडी, खळ्यातील तिवडा, घरातील धाबे, खुरपे/विळ्यांच्या मुठी, खुंटी, कुऱ्हाडीचा दांडा, जहाज बांधणीकरिता उपयोगी आहे. या लाकडामध्ये कार्बनचा प्रचंड साठा असतो. त्यामुळे ही लाकडे दीर्घकाळ जळतात. मोठ्या प्रमाणात उष्णता देतात.

येथे आहे बाभूळ
पूर्वी बाभूळ वने असत. आता प्रमाण कमी झालेले दिसते. मुद्दामहून कोणी बाभूळ लावत नाहीत. शहरातील राजाराम महाविद्यालयाचा माळ, शिवाजी विद्यापीठातील गवताळ जागा, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, रेणुका मंदिर ओढा, अन्य ठिकाणी बाभूळ दिसते.

औषधांत उपयोग ते सुगरणीचे घरटे
बाभळीचा त्वचारोग, अतिसार, रक्तस्त्राव, कंबरदुखी, दातदुखी, गुडघेदुखी, माणदुखीवरील औषधांचा जालीम उपयोग होतो. शेळ्या-मेंढ्यांना पाला, शेंगा मिळतात. शिवाय कितीतरी पक्ष्यांचे, किटकांचे वास्तव्य बाभळीवर असते. सुगरण पक्षी तर आपले घरटे नेहमी बाभळीवरच बांधते.

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय?
निसर्गातील शोषणच नव्हे, तर दररोजच्या वस्तूमधून कार्बन डायऑक्साईड, अन्य हरितगृह वायूचे उत्सर्जन करतो. असे उत्सर्जन किती होते, याचे मापन म्हणजे कार्बन फूटप्रिंट. कार्बन फूटप्रिंट म्हणजे व्यक्ती, संस्था, वस्तूमुळे उत्सर्जित होणाऱ्या हरित वायूंचे कार्बन डायऑक्साइडचे समतुल्य प्रमाण. जागतिक तापमानवाढ, कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचा थेट संबंध येतो. ही वाढ नियंत्रित करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल.
...
कोट
गावठी बाभूळ तोडू नका. बाभळीचे संरक्षण, संवर्धन करा. काटेरी असली तरी निसर्गाच्या परिसंस्थेत प्रत्येक वृक्षाचे महत्त्व आहे. ॲकेशिया गटातील १५ वनस्पतीत शिकाकाई, खैर, सोनखैर, लालखैर, मुरमाटी, भेसा, देवबाभूळ, हिवर, गावठी बाभूळ अशा वनस्पतींचा समावेश आहे. ॲकेशिया गटातील बाभूळवर्गीय वनस्पती अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड, हरितगृह वायू शोषून घेतात. यातून बाभळीपासून कार्बन क्रेडिट मिळेल.
- प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे